G-20 Summit In Pune | खा. वंदना चव्हाण यांचा जी 20 परिषदेवर आक्षेप, म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे येथे होत असलेल्या जी-२० परिषदेवर आक्षेप नोंदविला (G-20 Summit In Pune). त्या पुणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पुण्यात ही परिषद होणे ही अभिमानाची गोष्ट आहे पण लोकप्रतिनिधींना यात डावललं गेलं आहे. असा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला खासदारांना मिरवायला जायचे नव्हते परंतु उद्घाटन समारंभावेळी तरी त्यांना कार्यक्रमाला बोलवायला हवे होते. असे यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या. (G-20 Summit In Pune)

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमाबाबतचे निमंत्रण आमदार, खासदार, माजी महापौर यापैकी कुणालाही निमंत्रण नसणे हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, आम्हाला व्यासपीठावर बसायची हौस नाही पण ज्या विषयांवर चर्चा होणार होती ते किमान ऐकायला म्हणून बोलवायला हवं होतं. परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या विकासावर चर्चा होईल, आम्हाला कामाची दिशा मिळाली असती त्यामुळे किमान ऐकू द्यायला, उद्घाटनाला बोलवायला हवं होतं. मात्र आम्हाला सगळ्यांनाच डावललं गेलं आहे. अशी खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली. (G-20 Summit In Pune)

‘ही परिषद पुण्यात होणार म्हणुन आम्ही सगळे प्रचंड उत्सुक होतो. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या परिषदेचे निमंत्रण आम्हाला येईल या आशेने आम्ही आमदार, खासदार थांबलो होतो. मात्र आम्हाला या परिषदेसाठी निमंत्रणचं देण्यात आले नाही. अशा परिषदांमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होत असते. त्यात शहरासाठी काय करणे अपेक्षित आहे, याबाबतची माहिती आम्हाला मिळाली असती. यापूर्वी आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा अनेक परिषदेत सहभागी झालो आहोत. त्यानंतर अनेक कामांबाबत माहिती मिळाली किंवा त्यासंदर्भात वेगळ्या संकल्पना सुचल्या आहेत. त्यामुळे परिषदेशाठी निमंत्रण नसणं ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याचे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुशोभीकरणावर बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या की,
शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर आहे. त्यातच अनेक झाडे देखील कापल्याचे समोर आले आहे.
अस्वच्छता आणि खराब भिंती हे चित्र नेहमीच बघायला मिळतं.
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली.
मात्र ती तात्पुरती न करता नेहमीच अशी स्वच्छता करण्यात यावी.
तसेच शहराच्या सुशोभीकरणासाठी भिंतींवर जी चित्रे काढली आहेत. ती कशीही काढली गेली आहेत.
नुसती रंगरंगोटी करायची म्हणून ती चित्रं काढली गेली आहेत. अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

Web Title :- G-20 Summit In Pune | ncp rajya sabha member vandana chavan express displeasure for ignoring public representative in g 20 summit pune