Union Budget 2023 | यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे सुतोवाच

नवी दिल्ली : Union Budget 2023 | केंद्रीय अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मध्यमवर्गींयांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ‘पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही. मी स्वत: एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, त्यामुळे मी त्यांचे दु:ख समजते.’ यावरून आता येत्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी ही एक दिलासादायक बाब असू शकते, असे बोलले जात आहे. (Union Budget 2023)

राज्यांकडून निवडणूकांना समोर ठेवून मोफत योजनांची खैरात दिली जाते. यावर देखील यावेळी बोलल्या. अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या, ‘राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील का, असा प्रश्न त्यांना (राजकीय पक्षांनी) विचारायला हवा. (Union Budget 2023)

मोदी सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेत केलेल्या महत्वपूर्ण बदलांवर देखील यावेळी बोलताना त्यांनी प्रकाश टाकला. निर्मला सितारामन म्हणाल्या, ‘२०१३ मध्ये भारत जगातील ‘नाजूक पाच’ अर्थव्यवस्थांपैकी एक होती. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चढ-उतार होत असतानाही, लोकांचा विश्वास आहे की, भारतात स्थिर सरकार आहे आणि धोरणांमध्ये असमतोल नाही. डॉलर सोडून इतर सर्व चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे.’ असे त्या यावेळी म्हणाल्या. (Union Budget 2023)

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिक, करदाते, रेल्वे आणि इतर क्षेत्रांना फार मोठ्या आशा आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सरकारनं अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा दिला नाही.
त्यामुळे करदात्यांना या बजेटमधून मोठ्या अपेक्षा असतील.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारामन या त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार
असून मध्यमवर्गीयांना त्यातून मोठ्या अपेक्षा आहेत. (Union Budget 2023)

Web Title :- Union Budget 2023 | india no new taxes for income till five lakh annualy says fm nirmala sitharaman