Gadar: Ek Prem Katha | ‘गदर 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण मात्र प्रदर्शित करण्याअगोदर निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gadar: Ek Prem Katha | 2 दशकापूर्वीच्या गदर ‘एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ‘गदर 2’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Gadar: Ek Prem Katha)

 

‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या अगोदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 वर्षानंतर गदर एक प्रेम कथा पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. ‘गदर 2’ कथा पूर्वी गदर एक प्रेम कथा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे 2001 मध्ये ज्या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला होता त्याच तारखेला पुन्हा रिलीज होणार आहे.

 

‘गदर 2’ या चित्रपटाआधी गदर एक प्रेम कथा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
ज्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा संपूर्ण कथा पाहता आणि समजून घेता येणार आहे.
तर गदर एक प्रेम कथा हा चित्रपट 15 जून 2023 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे,
तर गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा गदर हा चित्रपट अनेक वर्षानंतर थेटर मध्ये पाहता येणार आहे.

 

Web Title :- Gadar: Ek Prem Katha | makers announces gadar ek prem katha will be released in theatre before gadar 2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर