Ganeshkhind Road Pune | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर

मेट्रो प्रकल्प आणि विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होईल – महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ganeshkhind Road Pune | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाजगी व शासकिय जागांचे भूसंपादन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाउल उचलले आहे. रस्ता रुंदी आणि मेट्रो स्टेशनच्या जिन्यांसाठी आवश्यक जागेसाठी तडजोडीने भूसंपादन करण्यास जागा मालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने जागा मालकांना नोटीसेस बजावत पुढचे पाउल उचलले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale IAS) यांनी दिली.

पीएमआरडीएच्यावतीने (PMRDA) गणेशखिंड रस्त्यावर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गीकेचे (Hinjewadi To Shivaji Nagar Metro Route) काम सुरू आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये (Pune University Chowk) दुमजली उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ मी. रुंद गणेशखिंड रस्त्याचे विकास आराखड्यानुसार ४५ मी. रुंदीकरण करण्यात येत आहे. तसेच या मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या जिन्यांसाठी काही खाजगी जागाही लागणार आहे.(Ganeshkhind Road Pune)

मेट्रो मार्गीका आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्यासाठी जागा कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी पावले उचलली आहेत. संचेती चौक ते चाफेकर चौकादरम्यान दोन्ही बाजूला प्रामुख्याने रस्ता रुंदीसाठी अडथळे येत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा शासकिय संस्था तसेच खाजगी मिळकती आहेत. आवश्यक असलेली जागा तडजोडीने भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. प्रामुख्याने टीडीआर, एफएसआयच्या माध्यमातून भूसंपादनासाठी प्रयत्न झाले आहेत. परंतू संबधित मिळकतधारकांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यास नकार दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घेण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.
यामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक सुमारे १४ हजार चौ.मी. जागा आणि त्यांचे मालक याची माहिती एकत्रित केली आहे.
भूसंपादनासाठी अपेक्षित खर्च सुमारे १४१ कोटी रुपयांचा अंदाजही तयार केला आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
अत्यावश्यक नागरीसुविधांसाठी प्रशासन कुठलिही जागा ताब्यात घेउ शकते या कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासन कामाला लागले आहे.
शासकिय व निमशासकिय संस्थांशी उच्च स्तरावर बोलणी करून टीडीआर अथवा एफएसआयच्या मोबदल्यात भूसंपादन करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल.
मेट्रो प्रकल्प तसेच उड्डाणपुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक ते प्रयत्न करेल.

  • राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : PF कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 10 लाखांची फसवणूक