Gang Rape In Pune | खळबळजनक! पुण्यात 15 वर्षाय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gang Rape In Pune | पुण्यातील हडपसर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन जणांनी एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.29) सायंकाळी साडेसहा ते साडे आठ दरम्यान मांजरी येथील मुळा मुठा नदी पात्रात असलेल्या झाडीमध्ये घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) येथे राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनुराग साळवे (वय 21 रा.आनंदनगर केशवनगर मुंढवा), गणेश अनिल म्हेत्रे (वय २३ रा. शिंदे वस्ती, मुंढवा) यांच्यावर आयपीसी 376, 376(डी) (ए), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीण या दोघींना सोमवारी सायंकाळच्या
सुमारास आरोपी अनुराग साळवे, गणेश अनिल म्हेत्रे यांनी पीडित मुलीला फिरायला जाऊ असे सांगितले.
त्यानंतर चौघेजण मांजरी येथील नदीपात्रालगत असलेल्या झाडीत गेले, आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे या
दोघांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी मुलीला त्याच ठिकाणी सोडून निघून गेले.
आरोपी अनुराग साळवे हा पहाटेच्या सुमारास पुन्हा त्या ठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला त्याच्या सोबत घेऊन
मुलीच्या घराबाहेर सोडून पळून गेला. या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार देताच, दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | मंडल अधिकारी घेतात हॉटेलमध्ये तर तलाठी कार्यालयात; वारसांची नावे लावण्यासाठी लाच घेताना एकाचवेळी केली दोन ठिकाणी कारवाई

Pune ACB Trap News | पुणे : लाच घेताना पुण्यातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Anil Babar Death | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन