Pune ACB Trap News | पुणे : लाच घेताना पुण्यातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | घरजप्तीच्या आदेशाला मुदवाढ देण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना दौंड तहसील (Daund Tahasil Office) कार्यालयातील महसूल सहाय्यकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.31) केली आहे. माधव राजाराम रेषेवाड (वय – 54) असे लाचखोर महसूल सहाय्यकाचे नाव आहे. (Pune ACB Trap News)

याबाबत 44 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने 9 आणि 10 जानेवारी रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर बुधवारी सापळा रचून माधव रेषेवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदार यांनी बँकेकडून कर्ज घेतले असून ते थकीत आहे. बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील येथील महसूल सहाय्यक माधव रेषेवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता रेषेवाड यांनी घर जप्तीची मुदत वाढवुन देतो म्हणून 10 हजार रूपयांची
पंचासमक्ष लाच मागणी केली. त्यानंतर बुधवारी सपाळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना माधव रेषेवाड याला
रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 7 अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे,
पोलीस उपअधीक्षक नितिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विरनाथ माने, पोलीस शिपाई तावरे, माने,
चालक चव्हाण यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | भाजपच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर; मला जेलमध्ये पाठविण्याचा पोलिसांचा प्लॅन (Video)

Pune Sahakar Nagar Crime | ब्रेकअप झाल्याच्या रागातून तरुणीचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, सहकारनगर पोलिसांनी गोव्यातून आवळल्या मुसक्या

ACB Trap On API | दोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात