Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | पुणे : गंगाधाम ते कात्रज -कोंढवा रोड दरम्यानचा परिसर झपाट्याने होतोय ‘हॉट स्पॉट’

बेकायदा गोदामे, बांधकामांमुळे भविष्यात बिबवेवाडी, कोंढवा, कात्रज, येवलेवाडी होणार 'बकाल'

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम – कोंढवा रस्त्यावरील (Gangadham To Katraj-Kondhwa Road) हिलटॉप हिलस्लोपवर बांधण्यात (Construction On Hilltop Hill Slope Zone) आलेल्या शेकडो बेकायदा गोदामांमुळे येथील सुरक्षा धोक्यात आल्याचे आज सकाळी लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) संगनमताने 10 ते 12 हेक्टर क्षेत्रावर उभारलेल्या शेकडो गोदामामुळे हा भाग ‘हॉट स्पॉट’ (Hot Spot) ठरत असून आजूबाजूला नव्याने उभ्या राहत असलेल्या व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमुळे तर भविष्यात बिबवेवाडी(Bibvewadi), कोंढवा, कात्रज, येवलेवाडी (Yewalewadi) परिसरात वाहतूक, पाण्याचा समस्यांसोबत मोठे बकालपण येण्याची चिन्हे दिसत आहेत. (Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone)

 

मार्केटयार्ड पासून (Marketyard Pune) अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर गंगाधाम येथून कोंढाव्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गोदामे उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (Pune PMC DP) हा भाग हिलटोप – हिलस्लोप म्हनून जाहीर असून बांधकामाला परवानगी नाही. तरीही गेल्या काही वर्षात 10 ते 12 हेक्टर परिसरात शेकडो गोदामे उभी राहिली आहेत. दुर्दैवाने ही गोदामे उभी राहत असताना येथील लोकप्रतिनिधींनी त्याकडे डोळेझाक केली आहे. तसेच पालिका प्रशासन देखील डोळ्यावर पट्टी बांधून कामकाज करत होते. केवळ नोटीस पाठवणे आणि जुजबी कारवाई करण्यापलीकडे पालिकेने Pune Municipal Corporation (PMC) त्या गोदमाना तीन पट मिळकत कर लावला. काही गोदामांचा हा कर थेट 50 ते 70 लाखांपर्यंत पोहोचला आहे. मध्यंतरी नोटीस पाठवल्यानंतर काही काळ खळबळ उडाली. परंतु लोक प्रतिनिधींच्या आशीर्वादाने अद्याप सगळे काही थंड बसत्यात आहे.

 

याउलट गंगाधाम ते कात्रज कोंढाव्याला जोडणारा रस्ता आणखी प्रशस्त करण्यासाठी प्रशासन व अधिकारी झटत आहेत. गंगाधाम चौकात तर पीपीपी तत्वावर 105 कोटी खर्च करून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच आनंद नगर या घोषित झोपडपट्टीतील नागरिकांसाठीची एसआरए स्कीमच्या (Pune Anand Nagar SRA Scheme) प्लॉटच्या मधून 205 चा रस्ता आखण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना देशोधडीला लावण्यात आले आहे.

गंगाधाम सोसायटीतील नागिरकाना मागील काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येत्या काही वर्षात गंगाधाम ते कोंढवा दरम्यान हजारोच्या संख्येने मोठे गृहप्रकल्प आणि व्यावसायिक आस्थापना उभ्या राहत आहेत. त्यासाठी बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, कात्रज, कोंढवा येथील टाक्यांतून लाखो लिटर पाणी द्यावे लागणार आहे. याचा फटका अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

आताच या ठिकाणी रस्ते प्रशस्त असताना मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
भविष्यात वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्याचाही फटका अगदी कोंढवा,
येवलेवाडी, कात्रज, बिबवेवाडी आणि बिबवेवाडी – कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांना बसणार आहे.

बेकायदा गोदामे, अपुरी सुरक्षा व्यवस्था , गोदामांच्या परिसरातील अरुंद रस्ते,
गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाचे बंब देखील आगीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही
अशी परिस्थिती यामुळे हा भाग झपाट्याने ‘हॉट स्पॉट’ होत असल्याचे ट्रेलर आजच्या आगीच्या दुर्घटनेनंतर पाहायला मिळाले आहे.

 

 

Web Title : Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | Pune: The area between Gangadham and
Katraj-Kondhwa Road is fast becoming a ‘hot spot’.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा