Gangstar Gaja Marne ! गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ?; उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   तळोजा तुरुंगातून (Taloja Jail) सुटल्यावर लॉकडाऊन (Lockdown) काळात कोरोनाचे निर्बंध (Corona restrictions) पायदळी तुडवून मिरवणूक काढणारा पुण्यातील कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे (Gangstar Gajanan Marne) याला मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) खडे बोल सुनावले आहे. तसेच, ‘तुरुंगातून सुटणं ही मोठी कामगिरी आहे का आणि गजा मारणे (Gangster Gaja Marne) हा सेलिब्रिटी (Celebrity) आहे का?, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) संतप्त सवाल उपस्थित करत फटकारले आहे. ‘गजा मारणे हा सेलिब्रिटी आहे का? (Is Gangster Gaja Marne a celebrity?)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गजा मारणे (Gangstar Gaja Marne) याची पत्नी जयश्री मारणे (Jayashree Marne) हिनं कारवाई विरोधात अर्ज दाखल करून गजा मारणेच्या सुटकेची मागणी अर्ज मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) दाखल केला आहे.
त्या अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. सुरेंद्र तावडे (Justice Prasanna Varale and Justice Surendra Tawde) यांच्या खंडपीठापुढे (Bench) सुनावणी झाली.

खंडपीठाकडून तीव्र नाराजी

सुनावणी दरम्यान खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त करत  ‘गजा मारणे हा सेलिब्रिटी आहे का? (Is Gaja Marane a celebrity?) असा संतप्त सवाल केला आहे.
तसेच, लॉकडाऊनमध्ये (Lockdown) कोविडमुळे (Covid) अनेक निर्बंध असताना.
सुरक्षित वावर राखणे आवश्यक असताना अशाप्रकारे मिरवणूक (Rally) काढणे शोभते का? तुरुंगातून सुटणं ही मिरवणूक काढण्याजोगी कामगिरी आहे का ? कोविड काळामध्ये नियम पाळण्याऐवजी अर्जदार मिरवणूक काढतात.
हे आश्चर्यकारक आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालय खंडपीठानं गजा मारणे याला फटकारले आहे.

सोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध ! हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण

काय आहे प्रकरण?

कुख्यात गुंड गजा मारणे (Gangster Gaja Marne) याच्यावर पुणे शहरासह (Pune City) जिल्ह्यात 24 गुन्ह्यांची नोंद (Crime record) आहे.
गेल्या वर्षी नवी मुंबईतील Navi Mumbai तळोजा तुरुंगातून सुटका झाली होती.
सुटकेनंतर कारागृहातून घरी येताना कार्यकर्त्यांच्या प्रचंड सहभागात त्याची मिरवणूक काढण्यात आली होती.
कोरोनाच्या नियम लागू असताना अशी मिरवणूक काढली होती.

गजा मारणेसह 100 जणांना अटक

या मिरवणुकी प्रकरणी पुन्हा एकदा गजा मारणेवर गुन्हा (FIR) दाखल झाला.
आणि गजा मारणेसह जवळपास 100 जणांना अटक (Arrest) केली होती.
या प्रकरणावरूनच मारणे याच्या पत्नीने अर्ज दाखल करून सुटकेची मागणी (Demand for release) केली.
या दरम्यान, गजा मारणेच्या सुटकेच्या अर्जा विषयी राज्य सरकारला (State Government) तीन आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्रावर (affidavit) उत्तर द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सरकारी वकील माधवी म्हात्रे (Government Advocate Madhavi Mhatre) यांना दिले आहेत.

Web Title : Gangster Gaja Marne | bombay high court slams gangster gaja marne for procession after acquittal, wife jayashree give application in hc

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले