Gangubai Kathiawadi Inside Story | ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भट्टला घालवावा लागला होता सेक्स वर्करसह बराच काळ, जाणून घ्या काय आहे कारण?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) आपल्या अभिनयामुळं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Inside Story) देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागला असून, लवकरच म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर आजच या चित्रपटाचा (Gangubai Katiawadi Trailer Out) ट्रेलर प्रदर्शित (Gangubai Kathiawadi Inside Story) झाला आहे. यामध्ये आलिया अनोख्या भूमिकेत दिसून येत आहे.

 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)’ या चित्रपटामध्ये आलियानं मुख्य भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिनं विशेष प्रयत्न केले असल्याचं म्हटलं जातंय. तिच्याकडून ही भूमिका चांगली निभावली जावी यासाठी तिनं कठोर प्रयत्न केले. गंगूबाईच्या भूमिकेसाठी आलिया चक्क मुंबईच्या रेड लाईट एरियामधल्या कामाठीपुरा येथील सेक्स वर्करसोबत बराच वेळ व्यतित केला. तिची भूमिका कामाठीपुरामधील सेक्स वर्कर्स प्रमाणे दिसावी आणि त्यांच्याच भाषेच्या शैलीमध्ये बोलताना दिसावं. या सगळ्यासाठी आलियानं सर्व गोष्टी केल्या आहेत. 60 च्या दशकात माफीया असलेल्या गंगूबाई देखील कामाठीपूरामध्ये वास्तव्यास होत्या.

 

 

 

दरम्यान, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी (Gangubai Kathiawadi Inside Story) प्रेक्षक प्रचंड आतुर झालेले पाहायला मिळतात.
हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचवणारा ठरत आहे. लवकरच आलिया ‘आरआरआर (RRR)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
तिच्यासोबतच या चित्रपटामध्ये राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Junior NTR) दिसणार आहे.
आलियासोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan), सीमा पहवा (Seema Pahwa),
हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि विजय राज (Vijay Raaz) हे देखील आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

 

Web Title :- Gangubai Kathiawadi Inside Story | gangubai kathiawadi trailer launch alia bhatt spends time with sex workers to understand their life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा