Ganpati Immersion 2023 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक चालली 30 तास 25 मिनीटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ganpati Immersion 2023 | दहा दिवस लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर गुरुवारी (दि.28) पुणेकरांनी गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला. पुण्याचे ग्रामदैव आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमधून गुरुवारी (दि.28) सकाळी 11.15 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी (दि.29) दुपारी 4.40 वाजता अखेरचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ झाला. त्यानंतर प्रशासनाने विसर्जन मिरवणुक संपल्याचे घोषीत केले. यंदाची मिरवणूक 30 तास 25 मिनिटे चालली. गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पाडल्याने पुणे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. (Ganpati Immersion 2023)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 28 तासांहून थोडी जास्त काळ यंदाची विसर्जन मिरवणूक चालली. गुरुवारी सकाळी सुरु झालेली मिरवणूक आज (शुक्रवार) दुपारीच्या सुमारास संपली.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची गणेश विसर्जन मिरवणूकीची सांगता थोडी लवकर झाली. गेल्यावर्षी मिरवणूक संपण्यासाठी 31 तास लागले होते. यंदा ही मिरवणूक 30 तास 25 मिनिटे चालली. अखेरचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे गेल्यानंतर प्रशासनाने मिरवणूक संपल्याचे घोषित केले. पुण्यातील मिरवणूक शांततेत पार पाडावी हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं. (Ganpati Immersion 2023)

मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला कालावधी

2016 – 28 तास 30 मिनिटं
2017 – 28 तास 05 मिनिटं
2018 – 27 तास 15 मिनिटं
2019 – 24 तास
2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे मिरवणुक निघाली नाही
2022 – 31 तास
2023 – 28 तास 40 मिनिटं

मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ

  1. मानाचा पहिला कसबा गणपती – 11.14 वाजता मिरवणूक सुरू तर 4.37 वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती – 12.15 वाजता मिरवणूक सुरू 5.11 वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती – 1.10 वाजता मिरवणूक सुरू आणि 5.54 वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन
  4. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती – 2.23 वाजता मिरवणूक सुरू तर 6.32 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  5. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती – 3.25 मिरवणूक सुरू तर 6.59 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.

पुण्यातील महत्त्वाच्या गणपतींच्या विसर्जनाची वेळ

  1. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट – सायंकाळी 4.29 वाजता मिरवणूक सुरू तर 8.50 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  2. हुतात्मा बाबु गेनु मंडळ – गुरुवारी (दि.28) रात्री 10.55 वाजता मिरवणूक सुरू तर शुक्रवारी (दि.29) पहाटे 4.43 वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  3. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट – मध्यरात्री 12.27 वाजता मिरवणूक सुरू तर शुक्रवारी (दि.29) सकाळी 6.35 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.
  4. अखील मंडई मंडळ – मध्यरात्री 2.05 वाजता मिरवणूक सुरू तर शुक्रवारी (दि.29) सकाळी 7.15 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.

10 दिवसांत पुण्यातील 3865 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन

पुण्यात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सहावा दिवस, नववा दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांमध्ये 3865 सार्वजनिक आणि 6 लाख 14 हजार 257 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

शहरातील विसर्जनाबाबतची माहिती

सार्वजनिक गणपती – पाचव्या दिवशी – 46, सहाव्या दिवशी – 9, सातव्या दिवशी – 358 आणि अनंत चतुर्दशी दिवशी – 2905 असे एकूण 3865 गणपतींचे 10 दिवसांत विसर्जन झाले.

घरगुती गणपती – दीड दिवसांचे गणपती – 55 हजार 329, तिसऱ्या दिवशी – 17 हजार 736, पाचव्या दिवशी – 43 हजार 306, सातव्या दिवशी -75 हजार 666, नवव्या दिवशी – 53 हजार 065 आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी 2 लाख 85 हजार 701 असे एकूण 6 लाख 14 हजार 257 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

मिरवणुकीत सहभागी मंडळे :

लक्ष्मी रोड – 292
टिळक रोड – 196
कुमठेकर रोड – 60
केळकर रोड – 76
एकूण- 624

खडकी, येरवडा, कर्वे रोड, दत्तवाडी या प्रमुख मार्गावरील मिरवणुकीत एकूण 1015 मंडळे सहभागी झाली होती. शहरातील 2905 सार्वजनिक मंडळांची मिरवणूक शांततेत पार पडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांना मातृशोक, सुजाता फडणीस यांचे निधन