गौतम अदानी यांची सर्वात मोठी ऐतिहासिक डील ! अदानी ग्रुपने खरेदी केली ‘ही’ कंपनी, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सॉफ्टबँक समुहाची सहायक एसबी एनर्जी इंडिया खरेदी केली आहे. ही डील 3.5 अरब डॉलर म्हणजे सुमारे 24,000 कोटी रुपयात पूर्ण झाली आहे. असे मानले जात आहे की, ही भारताच्या रिन्यूएबल सेक्टरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील आहे. अदानी एनर्जीने ही कंपनी सॉफ्टबँक ग्रुप आणि भारती ग्रुपकडून खेरदी केली आहे. अदानी ग्रीनने एसबी एनर्जीमध्ये सॉफ्टबँक ग्रुप आणि भारती ग्रुपची अनुक्रम 80 टक्के आणि 20 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. कंपनीकडून या डीलची माहिती बुधवारी देण्यात आली. गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योगपती म्हणून ओळखले जातात.

काय म्हणाले गौतम अदानी…
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले की, सॉफ्टबँक आणि भारती समुहाने जी संपत्ती बनवली आहे ती एक्सलंट आहे आणि कंपनीला तिचा वारसा पुढे नेण्याचा गर्व आहे. ही डील जानेवारी 2020 मध्ये सांगण्यात आलेल्या आमच्या व्हीजनच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. यामध्ये आम्ही 2025 पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर कंपनी बनणे आणि त्यानंतर 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी अक्षय कंपनी बनवण्याची योजना आखली आहे.

मतभेदांमुळे तुटली होती डील
एसबी एनर्जी इंडियाकडे भारताच्या चार राज्यांत पसरलेल्या 4,954 मेगावॅटच्या एकुण रिन्यूएबल पोर्टफोलियो आहे. यापूर्वी एसबी एनर्जीची कॅनेडीयन पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (सीपीपीआयबी) सोबत चर्चा सुरू होती परंतु इव्हॅल्यूएशनवर मतभेदांमुळे ही डील तुटली होती. यानंतर अदानी ग्रीन एनर्जीसोबत त्यांची चर्चा झाली होती.

या डीलने काय फायदा होणार
या अधिग्रहणाने अदानी ग्रीनच्या क्षमतेत 4954 मेगावॅटची वाढ होईल. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये सोलर, विंड आणि सोलर-विंड हायब्रिड प्रोजेक्ट सहभागी आहेत. यापैकी 1,400 मेगावॅटच्या योजना ऑपरेशनल आहेत तर उर्वरित वर काम सुरू आहे. सर्व प्रोजेक्ट्सकडे 25 वर्षांचे पॉवर पर्चेस अ‍ॅग्रीमेंट आहे. या डीलने अदानी ग्रीनची क्षमता 24,300 मेगावॅट झाली आहे.