Gautam Adani Meets Uddhav Thackeray | गौतम आदानी-उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : Gautam Adani Meets Uddhav Thackeray | भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. त्यातच भाजपा आणि शिंदे गटाने (CM Eknath Shinde) मिळून शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. असे असतानाच भाजपा नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे आणि जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम आदानी (Gautam Adani) यांनी काल मातोश्री निवासस्थानी (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौर्‍यावर असताना आदानींनी मातोश्रीला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

उद्योगपती गौतम आदानी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी घेतली, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. गौतम आदानी हे गुजरातचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबध आहेत. म्हणूनच, गौतम अदानी मोदी काळात राजकीय आणि उद्योग जगतात लक्षवेधक ठरले आहेत.

आदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानेही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत निश्चित माहिती नाही.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौर्‍यावर असताना आणि वेंदात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असताना ही भेट झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी गौतम आदानी यांच्याशी तब्बल 1 तास चर्चा केल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजप,
मोदी-शहा आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

Web Title :- Gautam Adani Meets Uddhav Thackeray | gautam adani meets uddhav thackeray discussion is bound to happen in political circles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | मॉलमध्ये वाईनविक्री सुरु करण्याबाबत शंभूराज देसाईचे संकेत; मविआ सरकारच्या काळात विरोध करणारे फडणवीस देणार का होकार?

Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर