Gautami Patil | नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या वडिलांचे पुण्यातील बिबवेवाडी (Bibvewadi) येथील रुग्णालयात निधन (Passed Away) झाले. रवींद्र पाटील (Ravindra Patil) असे त्यांचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी ते बेवारस अवस्थेत सापडले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचे निधन झाले. (Gautami Patil)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौतमीचे आई-वडील वेगळे राहतात. गौतमी (Gautami Patil) तिच्या आईबरोबर राहते. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खालावली होती. धुळ्याजवळील सूरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना ते बेवारस अवस्थेत सापडले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती. त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात (District Hospital Dhule) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडील आधारकार्डावरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर चव्हाण यांनी गौतमीशी संपर्क साधला. गौतमीने त्यांना उपचारासाठी पुण्यात आणले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच सोमवारी त्यांचे निधन झाले. धनकवडीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परवानगी नसताना सभा घेतल्या प्रकरणी संभाजी भिडेंसह 150 जणांवर FIR

Crime News | महिला पोलिसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा, प्रचंड खळबळ

Pune Mahavitaran News | पुणेकर वीजग्राहकांशी महावितरणचा थेट संवाद; पायाभूत वीजयंत्रणेसाठी ५१०१ कोटींची कामे प्रस्तावित – मुख्य अभियंता राजेंद्र पवार