SBI च्या अनेक सुविधा घरबसल्या मिळवा, डोअर स्टेप बँकिंगसाठी ‘या’ नंबरवर करा कॉल

नवी दिल्ली : जर तुम्ही एसबीआयचे (SBI) ग्राहक असाल तर चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डरचे पिकअप, अकाऊंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म डिपॉझिट, रिसिटसाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. अशाप्रकारच्या सुविधा भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना त्यांच्या घरी पुरवते. स्टेट बँकेने आपल्याया ऑफिशियल वेबसाइटवर आणि ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँकेचा टोल फ्री नंबर 18001037188 किंवा 18001213721 वर कॉल करा.

बँकेनुसार, डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसअंतर्गत ग्राहकांना घरी कॅश पिकअप, कॅश डिलिव्हरी, चेक रिसिव्ह करणे, ड्राफ्टची डिलिव्हरी, चेकची मागणी, रिसिट घेणे, जीवन प्रमाणपत्र पिकअप, केवायसी डॉक्युमेंट पिकअप, फार्म-15 चे पिकअप अशा सुविधा मिळतात.

सुविधांचा फायदा घेण्यासाठी हे करा
बँकेचे अ‍ॅप, वेबसाइट किंवा कॉल सेंटरद्वारे डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिससाठी रजिस्टर करता येते. तसेच कामकाजाच्या दिवसात टोल फ्री नंबर 1800111103 वर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कॉल करता येऊ शकतो. या सर्व्हिसबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://bank.sbi/dsb वर व्हिजिट करू शकता. तसेच तुम्ही आपल्या होम ब्रँचमध्ये सुद्धा संपर्क साधू शकता.

5.01.2018 पासून निवडक शाखांमध्ये खालील डोअरस्टेप बँकिंग सेवा उपलब्ध आहेत.

* रोकड प्राप्त करणे (कॅश पिकअप)
* रोकड भरणे
* चेक प्राप्त करणे (पिकअप)
* चेकची मागणी – रिसिट घेणे
* फॉर्म 15 एच घेणे
* ड्राफ्ट देणे
* मुदतठेव माहिती वितरण
* जीवन प्रमाणपत्र घेणे
* केवायसी कागदपत्र घेणे

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
* जोपर्यंत संपर्क केंद्रावर पूर्ण तयारी होत नाही, तोपर्यंत डोअरस्टेप बँकिंग सेवांसाठी विनंती केवळ गृह शाखेत करता येऊ शकते.
* रोकड काढणे आणि रोकड जमाची मर्यादा प्रतिदिन, प्रति व्यवहार 20,000 /-रु. आहे.
* प्रत्येक विना-आर्थिक व्यवहारासाठी सेवाशुल्क 60/-रु.+ जीएसटी आणि आर्थिक व्यवहारांसाठी 100/-रु.+ जीएसटी आहे.
* पैसे काढण्याची परवानगी चेक / पासबुकसह विड्रॉअल फॉर्म सादर केल्यानंतरच दिली जाईल.
* वितरणासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले जातील परंतु, याची वेळ टी + 1 कामाचा दिवस (सुटी सोडून) पेक्षा असणार नाही.
* अधिक माहितीसाठी कृपया आपल्या गृहशाखेशी संपर्क करा.

कुणाला मिळेल ही सुविधा

डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस अंतर्गत बँकेचा एखादा कर्मचारी आपल्या घरी येईल आणि कागदपत्र घेऊन जाऊन बँकेत जमा करेल. या सेवेद्वारे 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ, दिव्यांग आणि दृष्टीहिन लोकांना घरीच बँकिंग सेवा प्राप्त करण्यात मदत होईल.

मात्र, जॉईंट खाते असणार्‍या ग्राहकांना ही सुविधा मिळणार नाही. अल्पयीनांचे खाते आणि सीसी किंवा करंट अकाऊंट असणार्‍या लोकांना ही सुविधा मिळणार नाही.