Maruti Suzuki च्या कारवर मिळतोय तब्बल 49 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्वाची. कारण आता मारूतीने कारच्या खरेदीवर मोठा डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, तुम्हाला तब्बल 49 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती-सुझुकीने गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये कारच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामध्ये कच्च्या मालाची किंमती वाढल्याने कारच्या किंमती वाढवल्या जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. पण आता Maruti Suzuki कडून 49 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे.

मारूती S-Presso
मारूतीच्या S-Presso या कारवर 49 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 25 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.

Maruti Celerio :
Celerio कारवर मारूती सुझुकीकडून 44 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच यामध्ये 20 हजार रुपयांचाही कॅश डिस्काउंट मिळत आहे. 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.

Maruti Eeco :
Maruti Eeco कारवर मारूती सुझुकीकडून 44 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचाही कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेटही मिळत आहे.

मारूती आल्टो :
मारूती आल्टोवर कंपनीकडून 39 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचाही कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनसही मिळत आहे.

Maruti Dzire Tour S
Maruti Dzire Tour S या कारवर कंपनीकडून 39 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनसही मिळत आहे.

Maruti Swift
या कारवर 34 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.

Maruti Vitara Brezza
या कारवर कंपनीकडून 34 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचाही कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनसही मिळत आहे.

Maruti Dzire
या कारवर कंपनीकडून 32 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 8 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनसही मिळत आहे.

Maruti Ertiga
या कारवर कंपनीकडून कोणताही कॅश डिस्काउंट मिळत नाही. पण कंपनीकडून फेब्रुवारी महिन्यात या कारच्या खरेदीवर 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.