Girish Mahajan | मला जाणून बुजून लक्ष्य केले गेले; व्हायरल ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

धुळे – राज्याचे ग्रामविकास आणि धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची फोन वरील संभाषणाची एक ध्वनी फीत (Audio Clip) समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे. जिल्हा परिषद भरतीच्या (Zilla Parishad Recruitment) संदर्भात महाजन याचे विद्यार्थ्यांसोबते झालेले संभाषण या ध्वनी फीतमध्ये आहे. यावेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि विद्यार्थ्याचे जिल्हा परिषदेची परीक्षा केव्हा होणार, यासंदर्भात बोलणे झाले.

या संभाषणात विद्यार्थी महाजन यांना जिल्हा परिषदेची परीक्षा केव्हा होणार, हे विचारत आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला यासंदर्भात जवळ जवळ 400 – 500 फोन येऊन गेले. मला जाणून बुजून लक्ष्य केले गेले आहे. मला त्रास दिला जातोय. मी भरतीच्या संदर्भातील माणूस नाही. मला त्याबद्दल काही माहीत नाही. भरती आणि परीक्षा हा पूर्णपणे शिक्षण विभागाचा (Department of Education) प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) याविषयी जास्त माहिती देऊ शकतील. तुम्ही त्यांना विचारा, असे महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

तसेच आमचे सरकार भरतीचा विचार करत असून, आगामी काळात त्या लवकरच घेतल्या जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)
यांनी यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात आम्ही नोकर भरती (Recruitment) आणि शिक्षक भरती
(Teacher Recruitment) करणार आहोत, असे यावेळी महाजन यांनी सांगितले.

Web Title :-  Girish Mahajan | I was deliberately targeted; Girish Mahajan’s explanation on the viral audio clip

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक