Girish Mahajan On Sharad Pawar Health | ‘या’ भाजपा नेत्याची शरद पवारांच्या आजारपणावर टीका, म्हणाले ”कधी पावसात ओलं व्हायचं तर कधी…”, रोहित पवारांवरही साधला निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Girish Mahajan On Sharad Pawar Health | शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. तसेच बारामतीच्या सभेत (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादी फुटल्याचा प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या डोळ्यात पाणी आले होते. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. शरद पवार यांच्या पावसातील सभेचा उल्लेख करत महाजन म्हणाले, कधी पावसात ओलं व्हायचं. कधी रडायचं कधी आजारी पडायचं. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी टीका महाजन यांनी केली.(Girish Mahajan On Sharad Pawar Health)

रोहित पवार यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, शरद पवार यांची तब्येत कमी जास्त असते. त्यांना त्रास होत असतो. त्यांच्या प्रकृतीवर बोलणे उचित नाही. परंतु रोहित पवार दोन-तीन शब्द बोलले की, काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटते रडून निवडणुका लढता येणार नाही आणि जिंकता सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे लोकांना तुम्ही फार काळ वेडं बनवू शकणार नाही.

गिरीश महाजन म्हणाले, देशाच्या प्रश्नांवर बोला, कामावर बोला आणि मत मागा. रोहित पवार सभेत वारंवार रडतात,
डोळे पुसतात. तुम्ही तरुण आहात, तुम्ही म्हणतात की तुमच्या मागे मोठी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही मुद्द्यावर बोला.

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले,
पवारांचे कामच आहे टीकाटिप्पणी करणार मात्र प्रत्येक टीकेला उत्तर देण, हे आपल्याला काही आवश्यक नाही.
त्याचे उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना आता देतील. कुणी काय सांभाळले. कुणी काय नाही सांभाळले.
त्यामुळे आता या विषयावर न बोललेलच बरं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pimpri | पिंपरी : शेअर्स मार्केटच्या नावाखाली 38 जणांची एक कोटी 12 लाखांची फसवणूक

Baramati Lok Sabha Election 2024 | पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारमतीत अनुचित प्रकार घडला तर…; सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन ! नव्या भारतात लोकशाही धोक्यात – डॉ. शशी थरूर