गिरीश बदोले यांचा लिंगायत समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार

उमरगाः पोलीसनामा आॅनलाईन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे निकाल घोषीत झाले असून, राज्यात प्रथम व देशात विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गिरीश बदोले यांचा लिंगायत समाज उमरगा यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. श्री महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप होते.

गिरीश बदोले हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी गावचे आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असलेले बदोले यांनी अतिशय खडतर परिस्थतीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून काैतूक होत आहे. यावेळी बसव अभ्यासक महादेव पाटील, दिनेश बिराजदार, आकाश मोरे, बालाजी धनशेट्टी, कसगीचे युवा नेते जमीर मुल्ला तसेच बदोले यांचे वडील दिलीप बदोले यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.