#Insta : इंस्टाग्रामवर मतदान घेऊन मुलीने केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  : वृत्तसंस्था – १६ वर्षाच्या मुलीने लोकांच मत घेऊन आत्महत्या केल्याची घटना मलेशिया देशात घडली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवरून तिच्या मित्रांना विचारलं कि मी आत्महत्या केली पाहिजे का नाही ? तिने घेतलेल्या या मतदानावर ६९ टक्के लोकांनी तिने आत्महत्या केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. यानंतर तिने एका दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. १३ मे रोजी ही दुर्देवी घटना घडली.

पोलिसांनी सांगितलं की, तिने तिच्या पोस्टची हेडलाईन ‘हेल्प मी चूज डी / एल’ अशी दिली होती. जास्तीजास्त लोकांनी ‘डी’ हा पर्याय निवडला. डी चा अर्थ डेथ आणि एल चा अर्थ लाईफ असं म्हंटल जात आहे. या मुलीच नाव जाहीर करण्यात आलं नाही. तिने आत्महत्येपूर्वी फेसबुक स्टेट्स बदलले होते.

असही म्हंटल जात आहे की, मुलीने कौटूंबिक तणावामुळे हा निर्णय घेतला. मलेशियाचे युवा आणि खेळ मंत्री सैयद सद्दीक सैयद अब्दुल रहमान यांनी या दुर्देवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, देशाने या घटनेवर चिंतन केले पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास केला पाहिजे. त्यांनी युवा वर्गाच्या मानसिक स्थितिवर चिंता व्यक्त केली आहे.