Gmail Help Me Write | यापुढे मेल लिहिण्याचा ताप वाचणार; नव्या फिचरमुळे ऑटोमेटिक पद्धतीने लिहिला जाणार मेल

पोलीसनामा ऑनलाइन – Gmail Help Me Write | नवनवीन तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुखकर होत चालले आहे. आता नवी तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) काम खूप सोपे केले आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर जी मेल देखील करणार आहे. यामुळे मेलकर्त्यांना पूर्ण मेल लिहिण्याची गरज पडणार नसल्याचे गुगल (Google) तर्फे सांगण्यात आले आहे. गुगलने नुकत्याच झालेल्या त्यांच्या वार्षिक Google I/O 2023 इव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित बऱ्याच फीचर्सबाबत माहिती दिली. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते ‘हेल्प मी राइट’ (Gmail Help Me Write) हे फिचर. या नव्या फिचरमुळे जी मेल आणखी युजर फ्रेंडली होणार आहे.

गुगल कंपनीने याआधीच जी मेल आणि गुगल डॉक्समध्ये Google Docs लिखाणासाठी AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आता गुगल वर्कप्लेसवर (Google Workspace) याचा वापर केला जाणार आहे. हे फिचर आता iOS आणि Android साठी उपलब्ध असून, सध्या ज्यांनी वर्कस्पेस लॅब प्रोग्राममध्ये नोंदणी केली आहे, त्यांना याचा वापर करता येणार आहे. या फिचरमुळे ई-मेल लिहिणे सोपे होणार असून ऑटोमेटिक पद्धतीने मेल (Automatic Mail) लिहिला जाणार आहे.

गुगलच्या रिपोर्टनुसार, आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने युक्त असलेले हे हेल्प मी राइट फीचर वर्कस्पेस लॅब टेस्टर्ससाठी आणले गेले आहे.
आत्तापर्यंत, मेलमध्ये हेल्प मी राइट हि सुविधा केवळ डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी वर्कस्पेस लॅबचा भाग म्हणून उपलब्ध होती पण आता हे लेटेस्ट AI फीचर वापरकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य असा मेल तयार करणार आहे. यासाठी ते कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणार आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, या फीचरमध्ये युजरच्या प्रॉम्प्टच्या मदतीने मेसेज टाईप करता येत आहे.

हे नवीन हेल्प मी राइट कसे वापरायचे याबाबतही माहिती देण्यात आली आहे. वापरकर्त्यांनी iOS आणि Android
वर Gmail मध्ये कंपोज बटण टॅप करायचे. यानंतर स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे हेल्प मी राईट फीचरचा
(Gmail Help Me Write) ऑप्शन असणार आहे. तो निवडल्यानंतर मेलला काही शब्दांत कसला मेल हवा
याची माहिती लिहिल्यानंतर ते फिचर तुम्हांला योग्य असा मेल तयार करून देणार आहे.
उदा., “माझ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी धन्यवाद पत्र” किंवा “नोकरीचा अर्ज” अशी सूचना फक्त तुम्हाला
द्यायची आहे. त्यानंतर AI एक योग्य मेल जनरेट करेल. वापरकर्ता हा मेल थेट हवं दुसऱ्याला पाठवू शकतो.

Web Title :  Gmail Help Me Write | gmail help me write feature is now available know details about this ai based feature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अट्टल गुन्हेगार विवेक यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांचा डेटा होतोय चोरी; ‘हे’ ॲप्स लगेचच करा डिलीट

Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश