Gold Rate Today : धूलिवंदनला सोने झाले स्वस्त ! 8 महिन्यात 12 हजारांची घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेलेले सोने आता स्वस्त झाले आहे. लग्नसराईचा मोसम सुरु झाल्याने सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मागील आठ महिन्यात सोन्यामध्ये तब्बल 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. पुढील महिन्यात लग्नसराईचा मोसम सुरु होत असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सध्या सोन्याचा भाव 44 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

आज धुलिवंदन निमित्त मल्टी कमॉडिटी बाजार बंद आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात शुक्रवारी शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये काहींसी सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. MCX वर बाजार बंद होताना सोन्याचा भाव 44 हजार 560 रुपयांवर स्थिर होता. त्यामध्ये 45 रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी दिवसभरात सोन्याचा भाव 44 हजार 441 रुपये इतका खाली आला होता. तर चांदीचा भाव एका किलोसाठी 64 हजार 684 रुपयांवर बंद झाला होता. यामध्ये 185 रुपयांची घसरण झाली होती.

देशातील विविध शहरातील सोन्याचे भाव

Goodreturns या वेबसाईटनुसार आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव 42980 रुपये आहेत. तर 24 कॅरेटचा भाव 43980 रुपये आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 44070 रुपये आहे. तर 24 कॅरेटचा भाव 48070 रुपये इतका आहे. चेन्नईत 22 कॅरेटचा भाव 42240 तर 24 कॅरेटचा 46080 रुपये भाव आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 44200 तर 24 कॅरेटचा 46920 रुपये भाव आहे. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस 1726.45 डॉलर आहे. तर चांदीचा भाव 25.23 डॉलर प्रती औंस आहे.

चालू महिन्यात सोनं 1800 रुपयांनी स्वस्त

चालू महिन्यात सोनं 1800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट महिन्यात विक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या 12 हजार रुपयांनी स्वस्त आहे. 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा भाव 28 टक्क्यांनी वधारला होता. तर चांदीच्या दरात 10 हजारांची घसरण झाली आहे.

48 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते किंमत

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किंमतीत सध्या 44 ते 45 हजाराच्या घरात आहेत. शुक्रवारी एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरी सोने 45 रुपायांच्या घटीसह 44650 रुपयांवर बंद झाले. मात्र, लवकरच सोने 46 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमवर जाणार आहे. पुढच्या दोन महिन्यात सोन्याची किंमत 48 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.