Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. मात्र आज 12 जुलै (सोमवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात घसरण झाली आहे. सोन्याबरोबर चांदीचा दरहीकमी झाला आहे. गेल्या सत्रात बाजारात सोन्याची किंमत 46,965 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. तसेच चांदीचा भाव 67,911 रुपये प्रति किलोग्रॅम होता. Gold Price Today | gold and silver price decrease today check latest 12 july 2021 gold rate

आजची सोन्याची किंमत –

आज (सोमवारी) दिल्ली सराफा बाजारात (Delhi Bullion Market) सोन्याची किंमतीत 169 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरण झाली आहे.
तर दिल्ली बाजारात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा आजचा दर 46,796 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचला आहे.

आजचा चांदीचा भाव –

दिल्ली सराफा बाजारात (सोमवार) चांदीचा भाव (Silver Price Today) 300 रुपयाची घसरण होऊन 67,611 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

या दरम्यान, डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे गोल्ड रेटमध्ये घसरण पाहायला मिळाली.
तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याने भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातुच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
असं एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

7th Pay Commission | जुलै 2021 मध्येच वाढणार महागाई भत्ता ! पीएम नरेंद्र मोदी देऊ शकतात DA वाढीला मंजूरी

NEET 2021 Exam Date | जाहीर झाली नीट परीक्षेची तारीख, सप्टेंबरमध्ये ‘या’ दिवशी होईल परीक्षा; अर्ज प्रक्रिया उद्यापासून

Pune Crime Branch Police | पीएमपीएमएल चालकाच्या खूनाचा पर्दाफाश, गुन्हे शाखेकडून 24 तासाच्या आत 4 जणांना अटक