Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सराफा बाजारात सोने-चांदीच्या भावात (Gold Price Today) आज मोठा बदल दिसून आला. आज चांदीत 1223 रुपयांची मोठी घसरण झाली. तर, 24 ते 14 कॅरेटपर्यंतचे सोनेसुद्धा स्वस्त (Gold Price Today) झाले. यामुळे मागील अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. सोमवारी शुक्रवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 123 रुपयांनी घसरून 48150 रुपयांवर खुली झाली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion and Jewelers Association) जारी केलेल्या ताज्या रेटनुसार, आता 23 कॅरेट सोन्याची किंमत 47967 रुपयांवर आली आहे. तर, 22 कॅरेट सोने 44105 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावाने विकले जात आहे. तसचे, 18 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा आता 36113 रुपयांवर आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे जारी हे रेट आणि तुमच्या शहरातील भावात 500 ते 1000 रुपयांचे अंतर असू शकते.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट (ibjarates.com) नुसार 19 जुलै 2021 ला देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीचे हाजीर भाव अशाप्रकारे होते…

धातु 19 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅम)
16 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅम) रेटमध्ये बदल (रु./10 ग्राम)

गोल्ड 999 (24 कॅरेट) 48150 48273 -123

Gold 995 (23 कॅरेट) 47957 48080 -123

गोल्ड 916 (22 कॅरेट) 44105 44218 -113

Gold 750 (18 कॅरेट) 36113 36205 -92

गोल्ड 585 ( 14 कॅरेट) 28168 28240 -72

सिल्व्हर 999 67689 कि/ग्रॅ 68912 कि/ग्रॅ -1223 कि/ग्रॅ

Web Title : Gold Price Today | gold has become cheaper silver has fallen gold price today 19 july 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI मध्ये उघडले ‘हे’ खाते तर मुलांना सुद्धा मिळेल ATM कार्ड, ते दररोज काढू शकतील 5000 रूपये, जाणून घ्या

IMD Alert | मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पाऊस, पुढील चार दिवस ‘रेड अलर्ट’ !

Cadbury Chocolate | फॅक्ट चेक !भारतात विकल्या जाणार्‍या कॅडबरी चॉकलेटमध्ये ‘बीफ’ असते का? जाणून घ्या ‘सत्य’