Gold Price Today | सोन्याचा भाव वाढला, चांदी सुद्धा महागली; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Gold Price Today) आज म्हणजे 24 ऑगस्ट 2021 ला तेजी नोंदली गेली. यामुळे सोने 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तराच्या वर कायम राहिले. तर, चांदीची किंमत (Silver) सुद्धा आज वधारली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,374 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 61,412 रुपये प्रति कि. ग्रॅवर बंद झाली होती. यालट अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले तर चांदीत मोठा बदल झाला नाही.

 

सोन्याचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 170 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. यामुळे सोने 46 हजार रुपयांच्या स्तराच्या वर बंद झाले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,544 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. भारतीय सराफा बाजाराच्या उलट अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होऊन 1,801 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

चांदीचा नवीन दर

चांदीच्या किमतीत आज तेजीचा कल होता.
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 172 रुपयांच्या तेजीसह 61,584 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि ते 23.60 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

 

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरू आहे.
मात्र, न्यूयॉर्क येथील कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा हाजिर भाव किरकोळ प्रमाणात घसरला.
तर, डॉलरच्या तुलनेत रुपयात आज 9 पैशांची वाढ नोंदली गेली आणि तो फॉरेक्स मार्केटमध्ये आज 74.13 च्या स्तरावर खुला झाला.

Web Title : Gold Price Today | gold jumps rupees 170 and silver gains rupees 172 view details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update