Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 10 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजी दिसून आली. यामुळे सोन्याचा दर आज 47 हजार रुपयांच्या पुढे गेला. तर, चांदीच्या किमतीत (Silver price) आज मोठी घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात 10 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात 61 रुपयांची किरकोळ तेजी नोंदली गेली. याशिवाय चांदीच्या किमतीत (Silver Price Today) आज 651 रुपयांची मोठी घसरण झाली.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,952 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 59,888 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरून व्यवहार करत होते. तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 61 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी आली. यानंतर सोने राष्ट्रीय राजधानीत 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेले. आज दिल्ली सराफा बाजारात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,013 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ते 1,773 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदली गेली.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात 615 रुपयांची मोठी घट झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानीत ती 59,273 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात 21.84 डॉलर प्रति औंसवर स्थिर होते.

 

सोन्याच्या दरात का आली तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Security) सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की
आज कॉमेक्सवर (COMEX) सोन्याच्या हाजीर भावात (Spot Gold Prices) घसरण नोंदली गेली.
तर, मजबूत डॉलरने सोन्याच्या मागणीवर परिणाम केला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात उलथा-पालथ जारी आहे.
रुपया आज डॉलरच्या तुलनेत 18 पैशांच्या घसरणीसह 75.78 च्या स्तरावर पोहचला.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 10 december 2021 gold rate gains but silver declines drastically check latest price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय ! 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता (व्हिडीओ)

PMMY Scheme | 50 हजारपर्यंत मुद्रा लोन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 15 डिसेंबरपर्यंतच मिळेल विशेष सूट

Malaika Arora | 48 व्या वर्षी लेपर्ड प्रिंट ब्रालेट-स्कर्ट परिधान करुन मलायकाने वाढवला इंटरनेटवर पारा, चाहते म्हणाले – ‘वय होत चाललंय…’