Gold Price Today | खुशखबर ! सोने झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा ‘घसरण’; जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | रुपयाच्या मुल्यात वाढ झाल्याने दिल्लीत मंगळवारी सोन्याच्या दरात 100 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार या घसरणीनंतर दिल्लीत सोन्याचा दर 46,272 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिला. मागील सत्रात सोन्याचा दर 46,372 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold Price Today) राहिला होता.

स्थानिक सराफा बाजारात चांदीच्या किमतीत सुद्धा 134 रुपये प्रति किलोग्रॅमची घट दिसून आली.
यामुळे शहरात चांदीची किंमत 62,639 रुपये प्रति किलोग्रॅमवर राहिली.
मागील सत्रात चांदीची किंमत 62,773 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

अंतराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या किमती

अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर वेगासह 1,815 डॉलर प्रति औंसवर वाटचाल करत होता.
अशाप्रकारे चांदीची किंमत 24.16 डॉलर प्रति औंसवर राहिली.

रुपया झाला मजबूत

चलन विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 29 पैसे मजबूत होऊन 73 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. स्थानिक शेयर बाजारात मजबूतीचा कल आणि परदेशी गुंतवणुकीदरम्यान रुपयात लागोपाठ चौथ्या सत्रात मजबूती दिसून आली.

डिमांडची कमतरता असल्याने घसरण

जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात रिकव्हरी असूनही स्थानिक स्तरावर रुपयाच्या मुल्यात मजबूती आणि डिमांडची कमतरता असल्याने स्पॉर्ट मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.

 

सोन्याचा दर (Gold Price Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर 2021 मध्ये डिलिव्हरीच्या सोन्याची 90 रुपये म्हणजे 0.19 टक्केच्या घसरणीसह 47,074 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेडिंग होत होती.
अशाप्रकारे डिसेंबर कॉन्ट्रॅक्टच्या सोन्याच्या दरात 92 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
यातून डिसेंबर डिलिव्हरीवाल्या सोन्याचा दर 47,230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिला.

चांदीचा दर (Silver Price Today)

एमसीएक्सवर डिसेंबर 2021 मध्ये डिलिव्हरीच्या चांदीची किंमत 66 रुपये म्हणजे 0.10 टक्केच्या तेजीसह 63,653 रुपये प्रति किलोग्रॅमवर गेली होती.
अशाप्रकारे सप्टेंबर कॉन्ट्रॅक्टवाल्या चांदीची किंमत 278 रुपयाच्या तेजीसह 63,303 रुपये प्रति किलोग्रॅमवर वाटचाल करत होती.

 

Web Title : Gold Price Today | gold price tumbles rs 100 silver price tanks rs 134 know the latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ पदासाठी होतेय 111 जणांची भरती, जाणून घ्या

PM Svanidhi Yojana | पैशाची गोष्ट ! आता आणखी सहज मिळेल कर्ज, आरबीआयनं आणलाय विशेष प्रकारचा प्लान; जाणून घ्या कोणाला मिळणार

Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक