Gold Price Today : सोन्याचे दर पुहा घसरले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचा दर सतत चढउतार होत होता. काही दिवसापूर्वी सोन्याची किंमत वाढली होती. आता सोन्याचा वाढीचा दर स्थिर होत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. याचबरोबर दरात देखील घट झाली आहे. एमसीएक्स वर सोन्याची वायदे किंमत ०.३२ टक्क्यांनी घसरल्यानंतर भाव ४८,५२० रुपये प्रति तोळा झाला आहे. तसेच, चांदीमध्ये ०.४ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर ७२,०७३ रुपये प्रति किलो एवढी किंमत झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चढउतारामुळे भारतातील सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ महिन्यातील सर्वोच्च स्तर पार करून १,८५० डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक आहेत. अशी माहिती सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांनी दिलीय.

२४ कॅरेट सोन्याच्या किमती –

दिल्ली :
५०,८३० रुपये प्रति तोळा

चेन्नई :
५०,१६० रुपये प्रति तोळा

मुंबई :
४७,००० रुपये प्रति तोळा

कोलकत्ता :
५०,४७० रुपये प्रति तोळा