Gold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातील सततच्या घसरणीनंतर सोमवारी (दि. 21) सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) काहीशी वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या भावात जवळपास 1600 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.40 टक्के म्हणजेच 183 रुपयांनी वाढून 46,882 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price today) घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा दर 110 रुपयांनी घसरुन 67,488 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात (international bullion market) गेल्या 15 महिन्यातील सर्वात मोठ्या घसरणीच्या नोंदीनंतर सोन्याच्या दर सोमवारी (दि. 21) उच्च स्तरावर आहे.
अमेरिकी फेड रिझर्व्हने गेल्या आठवड्यात लवकरच व्याज दर वाढणार असल्याचे सांगितले होते.
इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर अनेक महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
याचा परिणाम सोने दरावर Gold Price देखील झाला आहे.
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 50, 320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर चेन्नईत 48, 380, मुंबईत 47, 210 रुपये, कोलकातामध्ये 48900 रुपये, बेंगळुरूमध्ये 47, 890 रुपये, लखनऊमध्ये 50, 320 रुपये इतका दर आहे.

Sanjay Raut । राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

अशी तपासा सोन्याची शुद्धता
केंद्र सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक App तयार केले आहे. BIS Care app ने ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या app द्वारे केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल करता येऊ शकते. वस्तूचे लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा असल्यास ग्राहक याचीही तक्रार या app वर करू शकतात. या app वर तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच ग्राहकांना याबाबत माहिती मिळू शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Gold Price Today gold rate fall 1600 rs in 2 days know todays know 21 june 2021 gold rate

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका