Gold Price Today | लागोपाठ तिसर्‍या दिवशी घसरले सोन्याचे दर, आता 27651 रुपयात मिळत आहे 10 ग्राम गोल्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला सुद्धा सोन्याचे दागिने बनवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत Gold Price Today लागोपाठ तिसर्‍या दिवशी घसरण नोंदली गेली. इतकेच नव्हे शुक्रवारी चांदी सुद्धा स्वस्त झाली. जर या आठवड्यातील व्यवहाराबाबत बोलायचे तर चार दिवस सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली तर एक दिवस सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

या आठवड्यात पहिल्या दिवशी सोमवारी किंमतीत घसरण झाली तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी सोने महाग झाले, तिसर्‍या दिवशी बुधवारी पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सुद्धा सोने स्वस्त झाले. तर शुकवारी सोन्याच्या किमतीत 355 रुपये आणि चांदीच्या किंमतीत 1141 रुपयांची घसरण दिसून आली. शुक्रवारी अंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1,791 डॉलर प्रति औंस आणि चांदी सुद्धा किंचित लाभासह 26.35 डॉलर प्रति औंसवर होती.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, या घसरणीनंतर शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 47266 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आली. तर चांदीची किंमत कमी होऊन 68379 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

मात्र, दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोने Gold Price Today 188 रुपयांच्या वाढीसह 46,460 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर गुरुवारी ते 46,272 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

Heavy Rains | पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; कोयना, राधानगरीतून पॉवर हाऊससाठी विर्सग

14 ते 24 कॅरेट गोल्डचा ताजा भाव
अशाप्रकारे भारतीय सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोने 47266 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47077 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43296 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35450 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27651 रुपये प्रति 10 ग्रामच्या स्तरावर बंद झाले.

जवळपास 9000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने
सोने सध्या प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे. म्हणजे,
सोने आपल्या ऑलटाईम हायपासून सुमारे 9000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.
परंतु, जाणकारांनुसार, येत्या काही दिवसात याच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
कोरोना संकट पाहता आशा आहे याची किंमत 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.
एका रिपोर्टनुसार मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोने नवीन विक्रम करू शकते.

60,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते
या लोकांचे म्हणणे आहे की, या वर्षी सोने 56000 चा विक्रमी स्तर सुद्धा पार करू शकते.
तर काही लोकांचे म्हणणे आहे की सोने Gold Price Today 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा पार करू शकते.
यामुळे आता सोने खरेदी केले तर चांगला रिटर्न मिळू शकतो.

सोने खरेदी करावे किंवा प्रतिक्षा करावी ?
मागच्या वेळी कोरोना संकटादरम्यान सोन्याने किंमतीचा नवीन विक्रम केला होता.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचली होती.
यामुळे सध्या सोने आपल्या उच्च स्तरापेक्षा सुमारे 7000 रुपये स्वस्त मिळत आहे.
या लोकांनुसार, आता तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी केली तर हा व्यवहार फायद्याचा ठरू शकतो.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Gold Price Today gold silver jewelry rate price update 19th june here know latest price

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित