Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर (Gold Price Today) वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. चीनमध्ये वाढलेला कोरोना संसर्ग (Coronavirus Infection), डॉलरचा (Dollars) वधारलेला दर अशा अनेक कारणांमुळे सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे.

चांदीची किंमत

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज चांदीचा दर (Silver Price Today) कालच्या बंद भावावरुन आज 13 रुपयांनी घसरून 69 हजार 696 रुपये प्रति किलो झाला आहे. दिवसाच्या व्यापाराच्या सुरुवातीला चांदीचा दर 69 हजार 758 रुपयांवर उघडला. मागील व्यापार सत्रात MCX वर चांदीचा भाव 47 रुपयांनी वाढून 69 हजार 689 रुपयांवर बंद झाला. तर जीएसटी सह (GST) हा भाव 70 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याची किंमत

आज सोन्याचे दर (Gold Price Today) 10 ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 49 हजार रुपये तर जीएसटीसह 56 हजार 650 रुपये आहे. सोन्याच्या दरांत वाढ झाल्याच्या किमतींच्या कारणांबाबत वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. यामध्ये चीनमध्ये पुन्हा वाढलेला कोरोनाचा संसर्ग हे प्रमुख कारण आहे. तसेच डॉलरचा वाधारलेला दर, अमेरिकन फेड रिझर्व्ह बँकांचे (American Fed Reserve Bank) व्याजदर विषयक धोरण आणि तोंडावर आलेला ख्रिसमस देखील यामागचे प्रमुख कारण आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की,
22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे.
BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

Web Title :- Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bollywood Actors | बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांवर देखील कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा प्रमाणे ओढवला होता प्रसंग

Veena Jagtap | वीणाला आली शिव ठाकरेची आठवण; काश्मिरमधील फोटो शेअर करत लिहीले…

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक