Bollywood Actors | बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांवर देखील कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा प्रमाणे ओढवला होता प्रसंग

पोलीसनामा ऑनलाइन : Bollywood Actors | सध्या कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा हा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला प्रेक्षकांनी एका कार्यक्रमात थेट चप्पलीचा चोप दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आपण जाणून घेऊया अशा कलाकारांनविषयी ज्यांना प्रेक्षकांचा मार खावा लागला. गौहर खानला आज प्रत्येक जण तिच्या वक्तव्यामुळे ओळखतो. गौहर खानचे अनेक चाहते देखील आहेत. अशाच चाहत्यांपैकी एकाने तिच्या कानशिलात लगावली होती. तिने घातलेले ड्रेस तिच्या चाहत्याच्या धार्मिक घटकांमध्ये मोडत नसल्याने त्याने ही कृती केल्याचे सांगितले जात होते. (Bollywood Actors)

एका प्रायव्हेट पार्टीमध्ये प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला एका मुलीने दारूच्या नशेत कानाखाली वाजवली होती. तर एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने सलमान खान बरोबरच अभिनेत्री सुष्मिता सेन सोहेल खान सह अनेकांना भर पार्टीत शिव्या दिल्या होत्या. या यादीत प्रसिद्ध गायक उदित नारायणचा देखील समावेश आहे. उदित नारायण नेहमीच त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे ओळखला जातो. अशा या गायकाला देखील एका मुलीने कानाखाली लगावली होती. (Bollywood Actors)

शक्ती कपूर यांचा किस्सा तर खूपच नवल आहे.
त्यांच्याच एका मित्राने दारूच्या नशेत त्यांना बेदम मारहाण केली होती. अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हटलं की ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अशा या अभिनेत्रीवर देखील तीन मुखवटे घातलेल्या लोकांनी हल्ला केला होता. तर अभिनेता करण सिंह ग्रोवरला तर त्याच्या पहिल्या पत्नीने म्हणजेच जेनिफर विंगेटनं कानशिलात लगावली होती.

Web Title :-Bollywood Actors | darshan thoogudeepa attacked gauahar khan to salman khan also slapped in public

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप