Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये 446 रूपयांची वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  दिल्ली सराफा बाजारात (Delhi bullion market) सोन्याचे दराने (Gold Price Today) आज (मंगळवार) उसळी घेतली आहे. आज सोन्याचे दर (Gold Price Today) 46 हजार रुपये प्रति तोळ्याच्या वर गेले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver) देखली मोठी तेजी आली आहे. त्यामुळे आज चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहेत. यापूर्वीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,014 रुपये प्रति तोळा होते. तर चांदी दर 61,564 रुपये प्रति किलोवर होते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (international market) सोन्याचे दर आज वाढले आहेत. परंतु चांदीच्या दरात विशेष बदल झाले नाहीत.

सोन्याचे आजचे दर

दिल्ली सराफा बाजारात आज (17 ऑगस्ट) सोन्याच्या दरात 446 रुपये प्रति तोळा वाढ झाली.
यानंतर सोन्याचे दर 46 हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत.
या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,460 रुपये प्रति तोळा झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1793 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीचे आजचे दर

सोन्या प्रामाणे चांदीच्या दरात देखील आज वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचे दर 888 रुपयांनी वधारले असून आज चांदीचा दर 62 हजार 452 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.
चांदीचे दर ग्लोबल मार्केटमध्ये (Global market) 23.88 डॉलर प्रति औंस आहेत.

 

Web Title : gold price today increased by rupees 446 and silver spiked by rupees 888 check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | स्वत:चा बिझनेस सुरू करायचा असेल तर मोदी सरकारची ‘ही’ योजना करेल मदत, मिळतील 10 लाख

Pune Camp News | पुणे कॅम्प परिसरातील बसस्टॉपचे शेड कोसळले, 6 नागरिक जखमी

Tata Motors | आकर्षक व्याजदरासह सर्व कारवर मिळणार 90 % फायनान्स, Tata Motors ने सुरू केली स्कीम