Gold Rate Today : सोन्याच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या दर

पोलीसनामा ऑनलाईनः जगभरात सुरू असलेले कोरोनाचे लसीकरण, अमेरिकेतील सत्तांतरण यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बऱ्याचदा सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलतात, त्याचा परिणाम भारतातील बाजारावरही दिसून येतो. सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम (1 तोळं) सोन्यासाठी 48, 330 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्यासाठी हाच दर 49, 330 रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 66,700 रुपये एवढा आहे. दरम्यान, याच आठवड्यात 23 जानेवारीला सोन्याच्या दरात 230 रुपयांची मोठी घट नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली होती.

देशातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमसाठी 48, 330 रुपये इतका दर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 48, 090 रुपये, चेन्नईत 46,360 रुपये इतका दर आहे. बंगळुरू, हैदराबाद, केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच 45,940 रुपये इतका दर नोंदवला आहे.