Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज तेजी पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange MCX) वर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्यात 0.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver) देखील वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजी असली तरी रेकॉर्ड लेव्हलपेक्षा सोने आज 9 हजार रुपयांनी स्वस्त आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळ्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
आता सराफा बाजारात सोन्याचे दर 47 हजार 286 रुपये प्रति तोळ्यावर आहेत.
अर्थात सोने जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त आहे.

सोन्या-चांदीचे आजचे दर (Gold-Silver Price Today)

MCX वर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर 47 हजार 286 रुपये प्रति तोळा झाले आहेत.
तर चांदीच्या दरात आज तेजी पहायला मिळत असून चांदीचे दर 0.19 टक्यांनी वाढून 62 हजार 251 रुपये प्रति किलो ग्रॅम इतके झाले आहेत.

सोने 50 हजारांवर जाणार

तज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50 हजारांचा टप्पा गाठेल.
त्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी असल्याने सोन्यात गुंतवणूक (gold investment) करण्यासाठी योग्य वेळ आहे.
सध्या सोन्याचे दर कमी असल्याने सोन्यात गुंतवणूक करु शकता.
आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरु शकतं.

 

Web Title : gold price today on 20th august 2021 gold and silver rates hike on friday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Ajit Pawar | ‘नमो’ मंदिराबाबत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले – ‘पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’