Gold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold price today | देशान्तर्गत बाजारात सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. काही महिन्यापूर्वी पुढील काळात सोन्याचा भाव वाढणार असल्याचं मत तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. गतवर्षी सोन्याचा भाव जवळपास 56,200 रुपये होता. त्याची तुलना करता सध्या सोन्याचा दर (Gold price) साधारण 50 हजाराच्या आत आहे. मात्र, एका विशेष माहितीनुसार येत्या 5 वर्षात 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांपर्यंत जाईल असा अंदाज क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये (MCX) सोन्याच्या दराला (Gold price) 46, 500 रुपयांच्या पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा भाव 46,615 इतका होता.
म्हणून सोन्याची किंमत सपोर्ट प्राईसच्या अतिशय जवळ आहे.
गेल्या दिवसाच्या किंचित घसरणीनंतर सध्या सोन्याचा दर कमी आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालेत.

या दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold price) घसरण पाहायला मिळाली.
मात्र आता येत्या काळात सोन्याचा भाव उच्चांकी पातळी गाठणार असल्याचा अंदाज अनेक जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, सोन्याचा दर जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही.
किंमत ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही.
सोन्याचा दर फक्त आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो.

 

Web Title : Gold Price Today | price 10 gram gold will go 90 thousand coming period find out todays rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही?

Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात; कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू

Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे