येत्या 2 महिन्यांत सोनं होणार महाग; जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बाजारात अनेक दिवसापासून सतत सोन्याच्या दरात घट्ट होत आहे. कालपर्यंत सोन्याच्या दरात घसरण होत असतानाच मात्र येत्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत सोने जवळपास ११५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. परंतु सोन्याच्या किंमतीत घट्ट होत आहे हे अधिक काळ राहणार नाही. सोन्याच्या किंमती पुन्हा वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली आहे.

सोन्याचा भाव सध्या प्रति ग्रॅम मध्ये ४४,४०० रुपये ते ४५,२०० रुपयांदरम्यान आहे. मात्र लवकरच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने ४६,००० वर पोहोचेल. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याच्या दरात अचानक वाढ होईल, सोन्याचा दर ४५,हजार रुपयांच्या पार जाईल ते ४८ हजार पर्यंत पोहोचेल. येणाऱ्या दोन महिन्यांत सोन्याची किमंत प्रति तोळा ४८,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असं (IIFL) सिक्योरिटीजचे वाइस प्रेसिडेंट (Commodity and currency) अनुज गुप्ता यांनी म्हटले आहे. २ महिन्यांत चांदीसुद्धा प्रति किलो ७०,००० ते ७२,००० रुपयांदरम्यान असणार आहे.

दरम्यान, आज (शनिवारी) २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम ४४,००० रुपयांपेक्षा खाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २२ कॅरेट सोने १६० रुपयांनी घसरून ४३,७६० रुपये झालं आहे. तसेच गुड रिटर्न वेबसाइट्सनुसार दर जाणून घ्या.

दिल्ली –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४३,८५०

चेन्नई –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४२,१६० रुपये

मुंबई –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४३,७६० रुपये

केरळ –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४१,७०० रुपये

लखनऊ –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४३,८५० रुपये

पाटणा –

२२ कॅरेट प्रति तोळा : ४३,७६० रुपये

तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ४४,९२० रुपये प्रति तोळावरून ४४,७६० रुपयांवर आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर केरळ, लखनऊ, पाटण्यात अनुक्रमे ४५,४९० ४७,८४०, ४४,७६० रुपये प्रति तोळा आहे.