Gold Price Update : पुन्हा 45 हजार झाले सोने, लवकर करा खरेदी; इतके वाढणार आहेत दर

नवी दिल्ली : लग्नसराईमध्ये सोने पुन्हा एकदा महाग होऊ लागले आहे. सोने पुन्हा 45000 हजारावर पोहचले. मोठ्या कालावधीनंतर सोन्याची किंमत 45000 प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेली आहे. या आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली. मंगळवारी चांदीच्या दरात सुद्धा तेजी होती.

मागील व्यवहाराच्या सत्रात सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 44,966 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 64,588 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. मंगळवारी सोन्याच्या भावात 83 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 45,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर पोहचले. आता सोने 45,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. या पूर्वीच्या व्यवहाराच्या सत्रात सोने 44,966 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदली गेली तर चांदीच्या दरात काही खास बदल झाला नाही. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढून 1,733 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

तज्ज्ञांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात जारी चढ-उताराचा परिणाम भारतीय सराफा बाजारांवर सुद्धा दिसून येत आहे. तर, कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकरणात तेजीमुळे शेयर बाजारात चढ-उतार पहायला मिळत आहे. न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आज खालच्या स्तरावर व्यवहार करत होते. अशावेळी भारतीय बाजारात गोल्डच्या किंमतीत किंचित घट नोंदली गेली आहे.

सोन्याच्या सध्याच्या भावाची जर ऑल टाइम हाय किमतीशी तुलना केली तर आज खुप स्वस्त मिळत आहे. सोन्याची किंमत सध्या आपल्या ऑलटाइम हायपेक्षा आतापर्यंत 11,000 रुपये प्रति दहा ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त झाली आहे. 7 ऑगस्ट 2020 ला सोने 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या सर्वाकालिन उच्च स्तरावर होते. ऑगस्टपासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 11000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त घट झाली आहे.

सराफा बाजार तज्ज्ञांनुसार, पुढील दोन महिन्यात सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. लवकरच सोन्याचा भाव 48000 रुपए प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो. सोन्यात गुंतवणूक वाढल्याने किंमतीत तेजी येईल. तर चांदीची किंमत पुन्हा एकदा 70 हजारच्या पुढे जाईल.