Gold Silver Price : वायदा बाजारात पुन्हा मोठी घसरण; आत्तापर्यंत 10 हजारांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था- गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने-चांदीचा दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत होते. मात्र, आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.03 टक्के घसरुन 46,580 रुपये दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीचा वायदा 0.15 टक्क्यांनी घसरून 66,884 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. यापूर्वी चांदीच्या दरात 1400 रुपये प्रतिकिलो इतकी वाढ झाली होती. त्यानंतर आता सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचा दर सुरुवातीला 44,000 रुपयांवर गेला होता. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56,200 रुपये प्रतितोळा झाला होता. पण त्यानंतर आता सोने तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीचे दर सातत्याने कमी होत असले तरी यावर्षी सोन्याचा दर 30-35 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. याबाबत इंडिया रेटिंग्सच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले, की आर्थिक गतिविधियोंच्या तुलनेने कोरोनापूर्व सोन्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा दिसत आहे. तसेच 10 हजार रुपयांच्या घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात तेजी पाहिला मिळत आहे.

दरम्यान, जगातील इतर देशांपेक्षा भारतात सोन्याची आयात सर्वात मोठ्या प्रमाणात केली जाते. आभूषण उद्योगात मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात केली जाते. त्यानुसार, भारतात दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात केली जाते.