Gold Rates Today : सोन्याचे दर 640 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या दरात तब्बल 1800 रुपयांची घसरण; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सतत कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे. तर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान मुंबई पुण्यात सोन्याच्या किंमतीत ६४० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतींत मात्र तब्बल १८०० रुपयांनी कमी झाले आहे. या दोन शहरात ० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर ४३,६२० रुपये एवढा आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचे दर ४४,६२० रुपये एवढा आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असल्याने, १ Kg चांदी ६३,९०० रुपये इतके झाले आहे. तर सोमवारी हा भाव ६५,७०० रुपये एवढा होता. परंतु चांदीच्या दराचा मागील १० दिवसात या किंमतीत चढ-उतार दिसत आहे. २८ फेब्रुवारीला १ Kg चांदीचा दर ६७,५०० रुपये एवढा होता, सध्या तो दर ६५,७०० रुपये झाला आहे. तसेच मागील काही दिवसात २४ तारखेला सोन्याचा भाव १०२० रुपयांनी वाढला असून त्यानंतर काल ६४० रुपयांची वाढ झाली. नाहीतर इतर दिवशी सोन्याच्या दरात सघट होताना दिसत होती. मागील महिन्यात, २८ फेब्रुवारीला सोन्याचा दर ४५,९३० रुपये होता.

ऑगस्ट २०२० रोजी सोन्याच्या दराने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरामध्ये आता जवळजवळ १२ हजारांहून अधिक रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळत आहे. या दरम्यान, मुंबईतील सोन्याच्या किंमतीवर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो आहे. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा दर ठरवला जातोय.