खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : या आठवड्यात सोन्याच्या किंमती सातत्याने कमी होत आहेत. सोन्याने शेवटच्या एक वर्षाची नीचांकी पातळी गाठली आहे. या व्यवसाय आठवड्यात गेल्या पाच दिवसांपासून सोन्यात निरंतर घसरण होत आहे. मंगळवारी रात्री जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची विक्रीच्या अनुषंगाने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 49 रुपयांनी घसरून प्रती 10 ग्रॅम 43,925 रुपयांवर गेले. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 43,974 रुपयांवर बंद झाले.

त्यानुसार चांदीचा दरही 331 रुपयांनी घसरून 62,441 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 62,772 रुपये प्रतिकिलो होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, अमेरिकेच्या आर्थिक वसुलीच्या अपेक्षेमुळे डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमती खाली आल्या.

एका वेबसाइटनुसार दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याचे दर 43,250 आणि 24 कॅरेटच्या किंमती 47,180 वर आहेत. मुंबईत 22 कॅरेटचे सोने 43,370 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव 44,370 रूपयांवर आहे. तर कोलकातामध्ये 22 कॅरेटचे सोने 43,680 रुपये आहे, तर 24 कॅरेटचे सोने 46,400 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 41,740 आणि 24 कॅरेटची किंमत 45,540 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्यााच्या या किंमती वआहेत.

त्याचबरोबर, जर चांदीबद्दल बोलायचे झाल्यास चांदी दिल्लीत 63,200 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मुंबई आणि कोलकाता येथे चांदीची किंमत समान आहे. चेन्नईमध्ये चांदी 67,300 रुपये प्रतिकिलोवर विकली जात आहे.

दुसरीकडे, अलीकडील कमकुवत हाजरी मागणीमुळे सोन्याच्या वायद्याच्या किंमतीही खाली आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांचे सौदे कमी केल्यामुळे बुधवारी वायदा व्यापारात सोन्याचे दर 0.1 ग्रॅम 0.13 टक्क्यांनी घसरून 44,366 रुपये झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून महिन्यात डिलिव्हरी सोन्यााच्या वायदाचे भाव 57 रुपये अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरून 44,366 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यात 12,591 लॉटमध्ये व्यापार केला गेला.