‘हा’ Google चा नवा ‘Android’ ! ‘हे’ नवे 10 खास ‘फिचर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google ने आपल्या ऑपरेटिंग सिस्टिम Android Q च्या ऑफिशिअल नावाची घोषणा केली आहे. यंदा गुगलने आपली नेहमीची परंपरा सोडून os चे नाव एखाद्या गोड पदार्थाचे न देता Android 10 ठेवले आहे. यावर अनेक टेस्टिंग नंतर त्यातील काही फिचर बद्दल माहिती मिळाली आहे जे यात असणार आहेत.

1. Dark Mode – या फिचरला पहिल्यांदा पब्लिक बीटाबरोबर रिलीज करण्याता आले होते आणि याबदद्ल io डेवलपर कॉन्फरन्समध्ये निश्चित करण्यात आले होते. या Android 10 मध्ये तुम्ही तुमच्या मर्जीनुसार डार्क मोड अनेबल करु शकतात. ज्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी क्षमता वाढेल.

2. Location – या Androidमध्ये यूजर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे गुगलने लोकेशन फिचरमध्ये बदल केले आहेत. लोकेशन ऑन ऑफ करण्याबरोबरच यात तिसरा पर्याय देण्यात आला आहे, यामुळे यूजर्स तेव्हाच लोकेशन वापरु शकतात जेव्हा यूजर्स संबंधित APP चा वापर करतील.

3. Fast Share – गुगलने हे नवे फिचर आणले आहे ज्यामुळे युजर्स कोणत्याही फाइलला सहज शेअर करु शकतात. या फिचरला fast share असे नाव देण्यात आले आहे.

4. Battery Indicator – सध्या आपण वापर असलेल्या फोन मध्ये बॅटरी टक्क्यात दाखवण्यात येते, परंतू या नव्या Androidमध्ये तु्म्ही पाहू शकतात की तुमची बॅटरी कधी पर्यंत चालेल. उदाहरणार्थ – 1 वाजेपर्यंत बॅटरी चालेल.

5. Colorful Themes – या Androidमध्ये स्मार्टफोन थीम्स बदलता येतील. कलरफुल थीम्स बरोबर UI यूजर इंटरफेस चेंज करु शकतात. WiFi – तुम्ही विना पासवर्ड देखील wifi ला कनेक्ट होऊ शकतात. कनेक्ट करण्यासाठी युजर्सला सतत पासवर्ड टाईप करावा लागणार नाही, यासाठी तुम्ही क्युआर कोड स्कॅन करु शकतात.

6. Third Party Apps Camera – यामुळे फोटो क्वालिटी प्रदान करु शकतात. यामुळे यूजर्स डेप्थ कंट्रोल करु शकतील.

7. Audio – Video Format – Androidचे नवे वर्जन ओपन सोर्स व्हिडिओ codec av 1 सपोर्ट करेल. हाय क्वलिटी व्हिडिओ कन्टेंट आणि व्हिडिओला अनेक फॉर्मेटमध्ये पाहता येईल.

8. Alert Option – यात नोटीफिकेशन ब्लॉक करण्यासाठी टॅप करुन नोटिफिकेशन ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

9. Desktop Mode – यानंतर आता फोन तुम्हाला डेस्कटॉपला कनेक्ट करता येईल. परंतू या संबंधित अधिक माहिती अजून समोर आली नाही.

10. Foldable Phone UI – गुगलने घोषणा केली होती की Android 10 फोल्डेबल स्क्रीनसाठी वेगळा UI सपोर्ट देण्यात येईल. डुअल डिस्प्लेनुसार UI एलिमेंट आपोआप बदलेल.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like