Google ‘या’ वैशिष्ट्यासह सर्व वायर्ड हेडफोन बनवितय ‘स्मार्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –    गुगल रेग्युलर वायर्ड हेडफोन्स गूगल असिस्टंट फिचरसह स्मार्ट बनवित आहे. या फिचरसह, कोणतेही रेग्युलर वायर्ड हेडफोन नोटिफिकेशन्स वाचण्यात आणि व्हॉईस कमांड्स सिंक करण्यास सक्षम असतील. आपण USB-C किंवा 3.5mm मिमी जॅकद्वारे वायर्ड हेडफोन घालताच आपल्या Android स्मार्टफोनमध्ये एक नोटिफिकेशन पॉप अप होईल. नोटिफिकेशन मध्ये टॅप केल्याने सेटअप प्रक्रिया सुरू होईल. यानंतर, वापरकर्त्यांना असिस्टंटला त्यांच्यासाठी सूचना वाचण्याची परवानगी द्यावी लागेल. यानंतर असिस्टंटला आणखी काही परवानगी द्यावी लागेल. मग सेटअप पूर्ण होईल.

व्हॉईस कमांडसाठी, आपण ईयरफोनवर कॉल-एक्सेप्ट बटन सिंक करू शकता. Google असिस्टंट सपोर्टसह, आपण फोन अनलॉक न करता केवळ व्हॉइसद्वारे पर्सनल रिजल्ट्स आणि कॅलेंडर इंफो मिळवू शकता. पूर्वी या सेटिंग्ज Pixel USB-C बड्स सह उपलब्ध होती. परंतु आता ते जवळजवळ सर्व वायर्ड इयरफोनसाठी उपलब्ध आहेत.

यापूर्वी गुगलने आपल्या असिस्टंटचे एक फिचर जाहीर केले होते, जे वापरकर्त्यांना ऑडिओ संदेश रेकॉर्ड करण्यास आणि पाठविण्यास परवानगी देते. या वैशिष्ट्यासाठी अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांनी माइक आयकॉन होल्ड करण्याची आवश्यकता नाही. ऑडिओ संदेश रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी, वापरकर्त्यांनी ‘Hey Google, send an audio message’ असे म्हणावे लागेल. किंवा प्राप्तकर्त्याचे नाव देखील शेवटी घेतले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर ऑडिओ मेसेजेस पाठवण्यासाठीही गुगल गूगल असिस्टंटचा वापर करू शकते. यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ मेसेज पाठवा’ ची व्हॉईस कमांड घ्यावी लागेल.