करोडपती बनण्याचा चान्स ! ‘हे’ काम करा अन् Google कडून व्हा ‘मालामाल’, 7 कोटींचं बक्षीस मिळवण्याची सुवर्णसंधी

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – जगातील दिग्गज टेक कंपनी Google ने टेक्निकल प्रोफेशनलसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. नवीन घोषणा अंतर्गत गुगलने म्हटले की, त्यांच्या अँड्रॉयड 12 च्या दोन्ही बिल्टमध्ये सिक्योरिटीमध्ये जो कोणी बग शोधेल त्याला गुगल 7 कोटी रुपये देणार आहे. गुगलने नुकतेच Andriod 12 चे पब्लिक बीटा व्हर्जन जारी केले आहे. Andtiod 12 चे बीटा व्हर्जन सध्या काही युजर्संसाठी आहे. याचा स्टेबल व्हर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रिलीज होणार आहे. Android 12 च्या बीटा व्हर्जन सोबत काही फीचर्सचा आनंद घेता येईल. बीटा व्हर्जन मध्ये बग असू शकतो. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. याचा परिणाम युझर्सच्या फोन फंक्शनवर पडू शकतो. त्यासाठीच गुगलने ही घोषणा केल्याची माहिती दिली आहे.

गुगलने म्हटले आहे की, 18 मे 18 जूनपर्यंत यातील बग शोधल्यास त्याला 50 टक्के बोनस रिवॉर्ड अमाउंट सोबत दिली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, काही आणि नॉन अँड्रॉयड बग आहेत. जे अँड्रॉयड सिक्योरिटीसाठी कमकुवत आहेत. याला रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत घेतले जाऊ शकते. सिक्योरिटी रिचर्सर जे गुगल बग बाउंटी प्रोग्रामचा भाग बनणार आहे. त्याला लेटेस्ट Android 12 Beta 1 आणि Android 12 Beta चे 1.1 ला अनालाईज करावे लागणार आहे. हे पिक्सल डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. अँड्रॉयड सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राममध्ये बग्स कव्हर केले जातील. जे एलिजिबल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. कंपनीचा दुसरा रिवॉर्ड प्रोग्रामचा भाग नाही.

एलिजिबल डिव्हाइस जो या प्रोग्रामचा भाग आहे
Pixel 5, Pixel 4a, Pixel 4a 5G, Pixel 4, Pixel 4 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 3 आणि Pixel 3 XL चा आहे. गुगलकडून दिलेले हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टेक्निकल प्रोफेशनल्ससाठी ही मोठी संधी असून, गुगलकडून 7 कोटींचे बक्षीस मिळवण्याची उत्तम संधी असल्याचे म्हटले जात आहे.