SBI मध्ये 2 हजार पदांसाठी भरती; थेट लिंकने करा अर्ज

पोलिसनामा ऑनलाइन – SBI PO Recruitment २०२० स्टेट बँक ऑफ इंडियाने, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर आहे. अ‍ॅप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२० आहे. एसबीआय ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षा ३१ डिसेंबर २, ४ आणि ५ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करणार आहे. तर याच्या रिझल्टची घोषणा जानेवारी २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे २हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण २ हजार जागांपैकी ८१० सामान्य पदं, ५४० ओबीसी, २०० ईडब्ल्यूएस आणि १५० पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट आलेला नाही, तेदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु, मुलाखतीला त्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.

थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी फी (Application Fees) –

सामान्य, EWS आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना ७५० रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.