खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारी नोकरी(Government jobs) करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदांसाठी कोणतीही परीक्षा, किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी(Government jobs) करण्याची संधी चालून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छूक उमेदवार 10 जूनपर्यंत अर्ज करु शकतात.

शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या 2428 पदांची भरती होत आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत यापूर्वी दोनवेळा वाढवण्यात आली होती. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता आला नव्हता त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मोठी संधी आहे.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

महत्त्वाच्या तारखा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 27 एप्रिलपासून सुरु झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.

पदांची संख्या

पोस्टाच्या या भरतीप्रक्रियेमधून महाराष्ट्रात एकूण 2 हजार 428 जागा भरल्या जाणार आहेत.

वेतन

पात्र उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

वयाची अट

अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी 18 ते अधिकाधिक 40 वर्षे असणे बंधनकारक आहे.

अशी होणार भरती

GDS पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही 10 वी मधील गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://appost.in/gdsonline/Home.aspx

नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’