बॉलिवूडमध्ये घराणेशाही ! अभिनेता गोविंदाची सणसणीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलाविश्वातील चार-पाच जण सारा कारभार पाहत असल्याचे सांगत अभिनेता गोविंदा हादेखील घराणेशाहीवर व्यक्त झाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने करण जोहर, महेश भट्ट आणि सलमान खान यांसारख्या दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. अभिनेत्री निर्मला देवी आणि अरुण कुमार आहुजा यांचा मुलगा असून सुद्धा मला कलाविश्वात स्थान मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागल्याचे सांगितले. गोविंदा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर आहेत.मात्र, ही लोकप्रियता मिळविण्यापूर्वी त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षावर त्यांनी भाष्य केले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी मी कलाविश्वात पदार्पण केले होते.

जवळपास 33 वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मी कलाविश्वातील माझा वावर हळूहळू कमी केला. जेव्हा मी यातून बाहेर पडत होतो. ज्यावेळी मी कलाविश्वात पदार्पण केले होते, त्यावेळी असे अनेक नवोदित निर्माते होते, ज्यांना माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी माहित नव्हते. मला अनेक वेळा त्या निर्मात्यांना भेटण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत होती. ते असे का वागतायेत याची मला पूर्ण कल्पना होती. परंतु, त्यांच्या या वर्तनाचा मी माझ्या कामावर आणि स्वत:वर कधीच परिणाम होऊ दिला नाही. मला माहित होते राज कपूर, जितेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांसारखे अनेक दिग्गजांनी या परिस्थितीचा सामना केला आहे.

या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे योग्य दृष्टीकोन हवा. एकतर तुम्ही प्रचंड मेहनत करा, नाही तर मग तुमच्याविषयी कोण काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करा, असेही गोविंदा म्हणाला. पूर्वी ज्याकडे टॅलेंट होते त्याला काम मिळत होेते. सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत होती. परंतु, आता चार-पाच लोकांनी संपूर्ण कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे जे लोक यांच्या जवळचे नाहीत त्यांच्या चित्रपटाचे नशीब हेच लोक ठरवतात. माझ्या काही चांगल्या चित्रपटांना प्रदर्शितच करता आले नाही. पण आता परिस्थिती बदलताना दिसते.