काय सांगता ! होय, एकाच व्यक्तीच्या PF खात्यावर 103 कोटी रुपये, तर 1.23 लाख खात्यांमध्ये 65,500 कोटी
पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात घसघशीत वेतन घेणाऱ्या व्यक्तींच्या नावे पीएफ खात्यात 62 हजार 500 कोटी रुपये आहेत. परंतु एका व्यक्ती अशी आहे जिच्या पीएफ खात्यात 103 कोटी रुपये आहेत. सू्त्रांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात वर्षाला पीएफ खात्यात अडीच लाखांपेक्षा जास्त अधिकचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागणार आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ईपीएफ मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या साडेचार कोटी एवढी आहे. यापैकी 0.3 टक्के म्हणजेच 1.23 लाख मतदार हे असे आहेत जे सर्वाधिक पगार घेतात. त्यांच्या खात्यावर दर महिन्याला मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होते.
जास्त वेतन घेणाऱ्या लोकांच्या पीएफ खात्यावर सध्या एकूण 62 हजार 500 कोटी रुपये जमा असून त्या पैशांवर करमाफी आणि 8 टक्के सुनिश्चित व्याजही दिलं जात आहे. हा लाभ या श्रीमंत व्यक्तींना साधारण कमाई असणाऱ्या आणि अन्य करदात्यांच्या पैशांच्या आधारे मिळत आहे. परंतु सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, एक व्यक्तीच्या नावावर 103 कोटी रुपये जमा असून इतर 2 व्यक्तींच्या नावावर प्रत्येकी 86 कोटी एवढी रक्कम जमा आहे.
ईफीएफचा लाभ घेणऱ्या 20 सर्वाधिक कमाई असणाऱ्या व्यक्तींच्या खात्यावर एकूण 825 कोटी रुपये जमा आहेत. तर जास्त कमाई करणाऱ्या 100 लोकांच्या एचएनआय खात्यांवर 2000 कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेला कर आकारण्याचा प्रस्ताव हा पीएफमध्ये योगदान देणाऱ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी आहे असंही सूत्रांनी सांगितलं आहे. निश्चित व्याज मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पीएफमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, एचएनआय खात्यात योगदान देणाऱ्या ईपीएफ खातेधारकांची संख्या 0.27 टक्के एवढी आहे. या खात्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावे 5.92 कोटी रुपये आहेत. निश्चित व्याजदराच्या आधारे या व्यक्तींना दरवर्षी 50 लाख 30 हजारांचा नफा मिळतो. यापुढं मात्र आता अडीच लाखांहून अधिक निधी पीएफ खात्यावर एका वर्षात जर जमा होत असेल तर त्यावर कर द्यावा लागणार आहे. या नवीन नियमामुळं 20 हजार खातेदारांना आता पीएफच्या खात्यावर कर द्यावा लागणार आहे.