बेस्ट डील ऑन ग्रोसरी ! फक्त 1 रुपयात खरेदी करा डाळ आणि पीठ तर 19 रुपयांना मिळणार साखर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई – कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांसाठी ओळखली जाते. बहुतेक लोक फ्लिपकार्टवरून केवळ दैनंदिन वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूच खरेदी करतात. परंतु फ्लिपकार्टवरून किराणा खरेदी केल्याने मोठ्या प्रमाणात बचत केली जाते. जर आपण या विकेंडला म्हणजे आज (6 मार्च) रेशन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला फ्लिपकार्टवर या किराणा वस्तू केवळ 1 रुपये आणि 19 रुपयांच्या किंमतीत मिळणार आहेत.

फ्लिपकार्टवरील ‘Grocery’ या विभागात दररोज 1 रुपयांचा डिल आणि 19 रुपयांची डीलदेखील उपलब्ध केली जाते. याव्यतिरिक्त किराणा डीलवर बँक ऑफरही दिली जात आहे. माहितीनुसार तुम्हाला एसबीआय बँकेमार्फत 10% तत्काळ सवलत मिळेल. 1 रूपये आणि 19 रुपयांच्या डील्ससंदर्भात बोलायचे झाल्यास या विभागात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. रवा, काबुली चणा, देसी तूप, साखर यासारख्या वस्तू अनेक वेळा 1 रुपयासाठी ग्राहकांना उपलब्ध केल्या जातात. तसेच प्लँटफॉर्मवर 19 रुपयांनाही अनेक वस्तू देण्यात येत आहेत.

1 रुपयाला खरेदी करा अर्धा किलो डाळ :
जर आपण 1 रुपयांच्या डीलबद्दल चर्चा केली तर ग्राहकांना यात 500 रुपये तूर डाळ, 1 किलो पिल्सबरी चक्की फ्रेश आटा, आणि 100 मिली आनंदा घीचे कार्टन 1 रुपयात खरेदी करू शकतात. याशिवाय ग्राहक 200 एमएल व्हेगी क्लीन 1 रुपयात घरी आणू शकतात. त्याचबरोबर आजच्या 19 रुपयांच्या डीलमध्ये 1 किलो Dhampure सल्फरलेस साखर ग्राहकांना दिली जात आहे. याशिवाय फ्लिपकार्ट वरुन 9 रुपयांमध्ये 75 ग्रॅम प्रियागोल्ड इटालियन बिस्किटही घरी आणता येईल.