लग्नात पसरला ‘कोरोना’, वराचा मृत्यू, वधूसह 9 जण ‘पॉझिटिव्ह’

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून एका कुटुंबातील नऊ जणांना कोरोनव्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. वधू देखील संक्रमित लोकांमध्ये आहे. संसर्ग ग्रस्त लोकांवर उपचार केले जात आहेत. 10 दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी वराचा मृत्यू झाला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, वराचा 4 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता, जेव्हा वराला ताप आला होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, परंतु त्याची कोरोना टेस्ट झाली नव्हती. यानंतर, संशयावरून कुटूंबााची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यानंतर नऊ लोकांना संसर्ग झाल्याचे समजले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, तरूणाने 25 नोव्हेंबर रोजी लग्न केले होते. लग्नानंतर लगेचच या तरूणाची तब्येत ढासळली आणि 4 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. कोरोना चाचणीत वधूसह 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यात वधूच्या सासूचा देखील समावेश आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याशिवाय खेड्यातील इतर लोकांच्या कोरोना तपासणीसाठी वैद्यकीय शिबीरही लावण्यात आले आहे. डॉ.नीता म्हणाल्या की, आरोग्य विभागातर्फे गावात कोरोना इन्व्हेस्टिगेशन कॅम्प लावण्यात आले आहे, जेणेकरून संपर्कात येणाऱ्या लोकांना ओळखून त्यांची तपासणी करता येईल.

डॉ.नीता कुलश्रेष्ठ यांनी माहिती दिली की जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संक्रमणाची 3673 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.