खुशखबर ! मेट्रोमध्ये मोठी भरती, 2.8 लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड(Gujarat Metro Rail Corporation Limited)नं मॅनेजर सहित इतर पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार जीएमआरसीची अधिकृत वेबसाईट gujaratmetrorail.com वर जाऊन 12 डिसेंबर 2019 किंवा त्याआधी ऑनलाईन अप्लाय करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 44 मॅनेजर आणि इतर पदांसाठी उमेदवार निडवले जाणार आहेत.

पदांचा तपशील-

प्रोजेक्ट विंगसाठी पुढील जागा

प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग आणि टेलिकॉम)- 1 पद.
जनरल मॅनेजर (फायनान्स)- 1 पद.
जॉईंट जनरल मॅनेजर (रोलिंग स्टॉक)-  1 पद.
मॅनेजर (E&M)- 2 पद.
असिस्टंट मॅनेजर (E&M)- 2 पद.
इंजिनियर  (रोलिंग स्टॉक)-  2 पद.
असिस्टंट मॅनेजर (अॅडमिन)- 2 पद.
असिस्टंट मॅनेजर (अस्सेट मॅनेजमेंट)- 2 पद

O&M विंगसाठी पुढील जागा

डेप्युटी जनरल मॅनेजर (ट्रॅक्शन)- 1 पद
डेप्युटी जनरल मॅनेजर (सिग्नलिंग)- 1 पद
डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलिंग स्टॉक)- 1 पद
डेप्युटी जनरल मॅनेजर (टेलिकॉम)- 1 पद
मॅनेजर (ऑपरेशन)- 2 पद
मॅनेजर (E&M)- 1 पद
मॅनेजर (ट्रॅक्शन)-  1 पद
मॅनेजर (सिग्नलिंग &PSD)- 1 पद
असिस्टंट मॅनेजर (E&M)- 1 पद
असिस्टंट मॅनेजर (सिग्नलिंग)- 1 पद
असिस्टंट मॅनेजर (टेलिकॉम &AFC)- 1 पद
सीनियर सुपरवायजर (ऑपरेशन्स)- 2 पद
सीनियर स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्राफिक कंट्रोलर- 2 पद
RRV ऑपरेटर- 8 पद

ट्रेनिंग इन्स्टिट्युटसाठी पुढीलप्रमाणे जागा

मॅनेजर(ट्रेनिंग)- 1 पद
सीनियर सेक्शन इंजिनियर (सिग्नलिंग & टेलिकॉम)- 1 पद
सीनियर सेक्शन इंजिनियर (रोलिंग स्टॉक/ ट्रॅक्शन/ इेलक्ट्रीकल सिस्टम)- 1 पद
सीनियर सेक्शन इंजिनियर- (सिव्हील/ट्रॅक)- 1 पद
सीनियर सुपरवायजर (ऑपरेशन्स)- 1 पद

शैक्षणिक पात्रता-

प्रोजेक्ट विंगसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे-

जनरल मॅनेजर (इलेक्ट्रीकल, सिग्नलिंग आणि टेलिकॉम)
या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांचं BE किंवा BTech(इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये ग्रॅज्युएशन सोबतच त्या संबंधित क्षेत्रात 2 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.

जनरल मॅनेजर (फायनान्स)-

यासाठी उमेदवार कॉमर्समधून ग्रॅज्युएशन सोबतच तो इंस्टिट्युट ऑफ चाटर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इंस्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा मेंबर असावा. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कॉमर्स ग्रॅज्यएट झालेला असेल किंवा MBA(फायनान्स) असेल तरीही तो अर्ज करू शकतो. याशिवाय त्याच्याकडे  2 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा-

या पदांसाठी 28 ते 58 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार  GMRCची अधिकृत वेबसाईट  gujaratmetrorail.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

वेतन-

या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदांनुसार 16000 ते 280000 पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

Visit : Policenama.com